Home /News /viral /

अबब! तब्बल 45 लाख रुपयांच्या उशीत आहे तरी काय? कुठे विकली जाते ही उशी?

अबब! तब्बल 45 लाख रुपयांच्या उशीत आहे तरी काय? कुठे विकली जाते ही उशी?

ग्राहकासाठी उशी बनवली जाते, तेव्हा 3D स्कॅनर वापरून खांदे, डोके आणि मान यांचे अचूक मोजमाप घेतले जाते. त्यानंतर अत्याधुनिक रोबोटिक मशीनद्वारे उशी डच मेमरी फोमने भरली जाईल, जी वापरकर्त्याच्या कवटीच्या आकारानुसार तयार केली जाईल.

    मुंबई, 28 जून : 'शौक बडी चिज है', असं बोललं जात. म्हणूनच अशा शौकीनांसाठी अशा काही वस्तू तयार केल्या जातात ज्याचा सर्वसामान्य लोक विचारही करुन शकत नाही. यातील काही वस्तूंच्या किमती एवढ्या जास्त असतात की त्या ऐकून थक्क व्हायला होतं. अशीच एक उशी आहे, ज्याला जगातील सर्वात महागडी उशी म्हटले जात आहे. या उशीमध्ये नीलम, सोने आणि हिरे जडलेले आहेत. नेदरलँडमधील फिजिओथेरपिस्ट 'थिज वेंडर हिलस्ट' यांनी 15 वर्षांच्या परिश्रमानंतर आणि संशोधनानंतर हे तयार केले आहे. उशीची खासियत म्हणजे ती घेताच तुम्हाला चांगली झोप येईल. टेलरमेड पिलो ( Tailormade Pillow) ही जगातील सर्वात खास आणि अॅडव्हान्स उशी आहे. इजिप्शियन कापूस आणि तुतीच्या रेशमापासून ही उशी बनवली आहे आणि ती नॉन टॉक्सिक डच मेमरी फोमने भरलेले आहे. Google ने उलगडलं विवाहित महिलांच्या सर्च हिस्ट्रीचं सिक्रेट, सगळ्यात जास्त काय शोधतात? नेदरलँडच्या थिज व्हॅन डेर हिल्स्टने (Thijs van der Hilst) ही उशी बनवली. आर्किटेक्चरल डायजेस्टच्या मते, ती $57,000 (अंदाजे 45 लाख रुपये) मध्ये विकली जाते. महागड्या कपड्यांसोबतच उशीला लक्झरी फील देण्यासाठी नीलम, हिरे आणि 24 कॅरेट सोन्याने सजवलेले आहे. थिज वँडर हिलस्टचा दावा आहे की याच्या वापरामुळे रुग्णांच्या झोपेचे विकार बरे होतील. उशीच्या झिपमध्ये 4 हिरे आणि एक नीलम आहे. एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या बॉक्समध्ये ही उशी ठेवण्यात आली आहे. प्रत्येक खरेदीदाराला उशाची एक स्पेशल एडिशन मिळेल. जेव्हा ग्राहकासाठी उशी बनवली जाते, तेव्हा 3D स्कॅनर वापरून खांदे, डोके आणि मान यांचे अचूक मोजमाप घेतले जाते. त्यानंतर अत्याधुनिक रोबोटिक मशीनद्वारे उशी डच मेमरी फोमने भरली जाईल, जी वापरकर्त्याच्या कवटीच्या आकारानुसार तयार केली जाईल. स्विमिंग पूल दिसल्यावर कुत्रा आला जोमात, करामत पाहून नेटकरी कोमात! पाहा Video उशा बनवण्यापूर्वी ग्राहकाच्या शरीराच्या वरच्या भागाचा आकार आणि झोपण्याची मुद्रा देखील लक्षात घेतली जाते. कंपनीने म्हटलं की, 'तुम्ही लहान आहात की मोठे, पुरुष आहात की महिला याने काही फरक पडत नाही. ही उशी उत्कृष्ट सपोर्ट करते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Sleep, Viral

    पुढील बातम्या