मराठी बातम्या /बातम्या /Viral /बायकोला चावला डास, नवऱ्याची पोलिसात तक्रार; डासांविरोधात झाली अशी कारवाई

बायकोला चावला डास, नवऱ्याची पोलिसात तक्रार; डासांविरोधात झाली अशी कारवाई

पत्नीला डास चावल्याची तक्रार पतीने पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी जे केलं तेसुद्धा आश्चर्यकारक आहे.

पत्नीला डास चावल्याची तक्रार पतीने पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी जे केलं तेसुद्धा आश्चर्यकारक आहे.

पत्नीला डास चावल्याची तक्रार पतीने पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी जे केलं तेसुद्धा आश्चर्यकारक आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

लखनऊ, 22 मार्च :  तुम्हाला डास चावले तर तुम्ही काय कराल? डासांना पळवण्यासाठी वेगवेगळे उपाय कराल, परिसरात जास्त डास झाले तर स्थानिक प्रशासनाकडे तक्रार द्याल जेणेकरून त्या डासांचा नायनाट करता येईल. पण तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटेल एका व्यक्ती डासांबाबत चक्क पोलिसात तक्रार केली आहे.  पत्नीला डास चावला, त्याची तक्रार नवऱ्याने पोलिसांकडे केली. या अजब तक्रारीनंतर पोलिसांनी जे केलं ते त्यापेक्षाही आश्चर्यकारक आहे.

उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. चंदौसीतील एका खासगी रुग्णालयात एका महिलेला दाखल करण्यात आलं होतं. ती प्रेग्नंट होती. तिची डिलीव्हरी झाली. तिने एका बाळाला जन्म दिला. पण रुग्णालयात डास होते. ते महिलेला चावत होते. त्यानंतर तिच्या नवऱ्याने थेट पोलिसांकडे डासांबाबत तक्रार केली. बायकोला डास चावल्यानंतर त्याने पोलिसांकडे मदत मागितली.

आता काय म्हणावं हिला! म्हणे, 'नवरा नको, स्मार्टफोन हवा'; मोबाईलवेड्या पत्नीने शेवटी पतीला....

यूपी पोलिसांना टॅग करत त्याने एक ट्वीट केलं. ट्वीटमध्ये त्याने म्हटलं. माझ्या पत्नीने चंदौसी हरी प्रकाश नर्सिंग होमममध्ये एका छोट्या परीला जन्म दिला आहे. माझी पत्नी वेदनेने तडफडत आहे आणि त्यासोबत डास तिला खूप चावत आहेत. कृपया मला लगेच एक मॉर्टिन कॉईल द्या.

आता पोलिसांकडे डासांबाबतची तक्रार तुम्हाला अजब वाटेल. तुम्हाला हसू येईल आणि पोलीस यात काय करणार, काहीच नाही. ही काय पोलिसात तक्रार देण्यासारखी गोष्ट आहे का?, असं तुम्ही म्हणाल. पण पोलिसांनी मात्र ही तक्रार गांभीर्याने घेतली. त्यांनी या व्यक्तीच्या ट्वीटला रिप्लाय दिला. त्यांनी कारवाईही केली.

भांडणामुळे फळफळलं नवरा-बायकोचं नशीब; पत्नीशी भांडला आणि पती झाला करोडपती

यूपी पोलिसांनी ट्वीट केलं आहे, ज्यात म्हटलं आहे. माफियापासून डासांपर्यंतचं निदान नर्सिंग होमममध्ये आपल्या नवजात बाळाला आणि प्रसूती झालेल्या बायकोला डासांपासून आराम मिळावा म्हणून एका व्यक्तीने ट्वीट करून मदत मागितली. यूपी पोलिसांनी त्वरित कार्यवाही केली आहे. नर्सिंग होमममध्ये मॉस्किटो क्वाइल पोहोचवलं आहे.

पोलिसांनी ट्वीटची दखल घेत रुग्णालयात या व्यक्तीपर्यंत लगेच मॉस्किटो क्वाइल पोहोचवल्याे ती व्यक्तीही भावुक झाली. तिने पोलसांचे आभार मानले.

First published:
top videos

    Tags: Uttar pradesh, Viral, Viral news, Wife and husband