मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ऐकावं ते नवल! छोट्याशा डासाने पकडून दिला चोर; कसं काय शक्य आहे तुम्हीच वाचा

ऐकावं ते नवल! छोट्याशा डासाने पकडून दिला चोर; कसं काय शक्य आहे तुम्हीच वाचा

एका घरात चोरी करणाऱ्या चोराला पकडून देण्यात डासाने पोलिसांची मदत केली आहे.

एका घरात चोरी करणाऱ्या चोराला पकडून देण्यात डासाने पोलिसांची मदत केली आहे.

एका घरात चोरी करणाऱ्या चोराला पकडून देण्यात डासाने पोलिसांची मदत केली आहे.

    बीजिंग, 16 जुलै : गुन्ह्यांच्या तपासात श्वानांचा वापर केला जात असल्याचं तुम्हाला माहिती असेल. बडेबडे गुन्हेगार श्वानांमुळे पोलिसांच्या हाती लागले. मोठमोठ्या गुन्ह्यांचा उलगडा श्वानांमुळे झाला आहे. पण कधी कोणत्या डासाने गुन्हेगार पकडून दिल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? काय आश्चर्य वाटलं ना? डास गुन्हेगार कसा पकडून देऊ शकतो, असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे. पण ही काल्पनिक, फिल्मी स्टोरी नाही. प्रत्यक्षात असं घडलं आहे (Chinese police found criminal from mosquito) . चीनच्या फुजियान प्रांतातील फुजो शहरातील एका घरात चोरी झाली. याचा तपास करायला पोलीस त्या घरी गेले. तिथं एका डासामुळे पोलिसांना चोराला पकडण्यात यश आलं. हे कसं शक्य झालं ते पाहुयात. चीनी न्यूज वेबसाईट ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार फुजे शहरातील रहिवाशी अपार्टमेंटमध्ये जिथं चोरी झाली तिथं पोलीस तपास करायला गेला. घराचा दरवाजा बंद होता, त्यामुळे चोर बाल्कनीतून घरात घुसला असावा असा अंदाज पोलिसांनी लावला. घरात किचनमध्ये उकडलेली अंडी, न्यूडल्स, बेडवर विस्कटलेलं बेडशीड, उशी मिळाली. त्यामुळे चोर या घरात काही वेळ राहिला आणि त्यानंतर सामान चोरून पळाला, हे पोलिसांना समजलं. हे वाचा - Dog Video - जिथं चाटला विचित्र जीव तिथं हुंगताच श्वानाचा मृत्यू; काही क्षणातच तडफडून तडफडून झाला मृत्यू आता पोलीस तपास करताना पुरावा असेल म्हणून अगदी लहान लहान गोष्टींकडेही लक्ष देतात. काही वस्तू आपल्या ताब्यात घेतात. असाच बारकाईने तपास करत असताना पोलिसांना भिंतीवर एक मृत डास चिकटलेला दिसला. त्याचं रक्त त्या भिंतीला लागलं होतं.  ऑडिटी सेंट्रल वेबसाईटच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी त्या डासातून मिळालेल्या रक्ताची डीएनए टेस्ट करायचं ठरवलं. तेव्हा ते डीएनए एका चाय नावाच्या व्यक्तीच्या डीएनएशी जुळत असल्याचं समजलं. ज्याच्यावर याआधी बरेच गुन्हे दाखल होते. त्याचा जुना क्रिमिनल रेकॉर्ड होता. हे वाचा - पिल्लू खड्ड्यात पडताच बेशुद्ध झाली आई, पिल्लू बाहेर येताच शुद्धीवर आली; पाहा चमत्कारिक VIDEO 19 दिवसांनंतर त्याला चौकशीसाठी बोलावलं. तेव्हा त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्या घरासह आणि चार घरांमध्ये त्याने चोरी केल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crime, World news

    पुढील बातम्या