OMG! 7 कोटी 16 लाखांच्या नोटा वापरून तयार केला सिंहासन, तुम्हीही काढू शकता बसून फोटो

OMG! 7 कोटी 16 लाखांच्या नोटा वापरून तयार केला सिंहासन, तुम्हीही काढू शकता बसून फोटो

तुम्ही सोन्या, चांदीचे सिंहासन पाहिले असेल पण कधी 7 कोटींच्या नोटाचे सिंहासन पाहिले आहे?

  • Share this:

मॉस्को, 03 डिसेंबर : 'शौक बडी चीज होती है', हे हिंदी चित्रपटांमधले सुप्रसिध्द वाक्य तुम्ही सतत ऐकले असेल. मात्र खरच मोठे मोठे शौक पाळणारे लोक कमी असतात. यात लोकांचे छंदही अनन्य आहेत. काहींना नोटा जमवण्याचा छंद असतो, पण कधी नोटा जमा करून तब्बल 7 कोटींचा सिंहासन पाहिला आहे? नाही ना. मात्र मॉस्कोच्या एका अवलियानं असा प्रकार केला आहे.

मास्कोमधील एक अवलियान तब्बल 10 लाख डॉलर्स (7 कोटी 16 लाख) वापरून एका सिंहासन तयार केले आहे. सध्या मॉस्को येथील संग्रालयात प्रदर्शनासाठी हे सिंहासन ठेवण्यात आले आहे. त्यामुळं तुम्ही या नोटांच्या सिंहासनावर बसून फोटोही काढू शकता. मुख्य म्हणजे हे सिंहासन बुलेटप्रूफ ग्लास वापरून तयार केले गेले आहे. मॉस्कोमधील आर्ट रेसिडेन्स येथे हे प्रदर्शनात ठेवले गेले आहे. अलेक्सी सर्जेनको यांनी अब्जाधीश इगोर रायाबकोव्हच्या पैशाने हे केले. या सिंहासनाला ‘मनी थ्रोन एक्स 10’ असे नाव दिले आहे.

फोटो सौजन्य- रॉयटर्स

फोटो सौजन्य- रॉयटर्स

'मनी सिंहासन एक्स 10' ही एक प्रकारची खुर्ची असून बुलेटप्रूफ ग्लासच्या अडीच इंचाच्या थरातून बनविली जाते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे सात कोटींच्या नोटांचा गठ्ठा ते तयार करण्यात आले आहे. हे सिंहासन रशियाची राजधानी मॉस्कोच्या उत्तरेकडील कला निवास येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. ही सिंहासन आजकाल आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

फोटो सौजन्य : AP

फोटो सौजन्य : AP

पैशाच्या सिंहासनाचे उद्घाटन एका सार्वजनिक कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी पैसा, पैसा, पैसा असे रशियन सूरही वाजवले गेले. या सिंहासनाचे उद्घाटन झाल्यानंतर रियाबकोव्ह म्हणाले की, “या सिंहासनावर बसणे लोकांच्या स्वप्नासारखे असू शकते. पैशाच्या सिंहासनावर बसून फोटो काढता येतील इतके पैसे मिळविण्याचा लोक विचारही करू शकत नाहीत. या खुर्चीवर बसलेला आणि छायाचित्रित केलेल्या व्यक्तीस आतमध्ये भिन्न ऊर्जा देईल”, असे सांगितले.

फोटो सौजन्य : AP

फोटो सौजन्य : AP

संपत्ती दर्शविण्यासाठी विचित्र स्टंट

रायाबकोव्ह आपली संपत्ती दर्शविण्यासाठी विविध विलक्षण स्टंट्स दर्शविण्यासाठी ओळखला जातो. अशा स्टंट्सद्वारे ते इतरांना आर्थिक यश मिळविण्यास प्रोत्साहित करतात. सेंट पीटर्सबर्गमधील गॅझप्रोम अरेना येथे झालेल्या व्यवसाय परिषदेदरम्यान, 20,000 डॉलर्सची (14 लाख) रुपयांची उधळण केली होती. त्यामुळं रायाबकोव्हनं तयार केलेले हे सिंहासन आपली संपत्ती दाखवण्याचा त्याचा एक स्टंट असल्याचे बोलले जात आहे.

Tags:
First Published: Dec 3, 2019 06:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading