Home /News /viral /

पार्कमध्ये फिरणाऱ्या महिलेवर शेकडो उंदरांचा हल्ला; झाली भयंकर अवस्था

पार्कमध्ये फिरणाऱ्या महिलेवर शेकडो उंदरांचा हल्ला; झाली भयंकर अवस्था

महिलेचं असं म्हणणं आहे, की रात्रीच्या वेळी ती पार्कमध्ये फिरत होती, तेव्हाच उदरांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिचे हातपाय कुरतडून तिला जखमी केलं.

    लंडन 26 जुलै: एका महिलेनं असा दावा केला आहे, की तिच्यावर 100 हून अधिक उदरांनी हल्ला (Rats Attack) केला आहे. महिलेचं असं म्हणणं आहे, की रात्रीच्या वेळी ती पार्कमध्ये फिरत होती, तेव्हाच उदरांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिचे हातपाय कुरतडून तिला जखमी केलं. या घटनेनंतर महिला घाबरली आणि तिनं लोकांनी रात्रीच्या वेळी पार्कमध्ये न जाण्याचा सल्ला दिला. द सनमध्ये आलेल्या वृत्तानुसार, लंडनमध्ये (London) राहाणाऱ्या 43 वर्षी सुसान ट्रेफ्टब (Susan Treftub) 19 जुलै रोजी रात्री 9 वाजताच्या आसपास नॉर्थफील्ड्स, ईलिंग येथील ब्लोंडिन पार्कमध्ये फिरत होत्या. इतक्यात त्यांची नजर पार्कमध्ये असलेल्या शेकडो उदरांवर गेली. एकसोबतच इतके उंदीर पाहून सुसान घाबरल्या. त्या पार्कमधून बाहेर पडणारच होत्या, इतक्यात उंदरांनी तिच्यावर हल्ला केला. डोळे बंद करून नवरीला KISS करायला गेला अन्..; नवरदेवाचा VIDEO पाहून पोट धरून हसाल सुसाननं म्हटलं, की मी इतक्या उदरांना एकसोबत कधीच पाहिलं नव्हतं. ते 100 हून अधिक उंदीर असतील. मला असं वाटलं होतं, की आता मी आजारी होणार आहे. हे उंदीर माझ्या पायावर चढत होते आणि मी त्यांना पायानं दूर करत होते. अंधरामुळे इतके उंदीर नेमके आले कुठून हेदेखील आपल्याला समजलं नसल्याचं तिनं सांगितलं. त्यांनी सांगितलं, की उंदीर माझे पाय कुरतडत होते आणि माझ्या शरीरावर चढण्याच प्रयत्न करत होते. मौसम मस्ताना अन् बिअरचा ट्रक उलटला असताना, गावकऱ्यांनी बॉक्सच केले गायब, VIDEO सुसानं सांगितलं की उंदरांनी तिच्या हातावर आणि पायावर अनेक ठिकाणी चावा घेतला. मात्र, सुदैवानं त्यांना यात गंभीर जखम झाली नाही. मात्र, हे सगळं घडत होतं, तेव्हा कोणाकडे मदत मागू हेच समजत नसल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे रात्रीच्या वेळी पार्कसारख्या ठिकाणी जाणं टाळा, असा सल्ला तिनं इतरांनी दिला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Attack, Viral news

    पुढील बातम्या