मराठी बातम्या /बातम्या /Viral /मोबाइलने माकडांनाही लावलय वेड; VIDEO पाहून पोट धरून हसाल

मोबाइलने माकडांनाही लावलय वेड; VIDEO पाहून पोट धरून हसाल

हे दोघं एकमेकांशी केवळ मोबाइलवरून (Mobile) भांडताना दिसत आहेत.

हे दोघं एकमेकांशी केवळ मोबाइलवरून (Mobile) भांडताना दिसत आहेत.

हे दोघं एकमेकांशी केवळ मोबाइलवरून (Mobile) भांडताना दिसत आहेत.

    Viral Video : इंटरनेटवर (Internet) प्राण्यांच्या गमतीदार व्हिडिओजना चांगली पसंती मिळते. अनेक युझर्सनी खास पाळीव प्राण्यांची पेजेस सोशल मीडियावर (Social Media) सुरू केली आहेत. या माध्यमातून कुत्री, मांजर आदी पाळीव प्राण्यांच्या मजेशीर घडामोडी शेअर केल्या जातात. अशा पेजेसच्या फॉलोअर्सची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. व्हिडिओ एखादा मनुष्य आणि प्राण्याचा असेल तरीदेखील या अनोख्या नात्याचा आनंद लोक घेताना दिसतात.

    सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगी आणि माकड मोबाइलवरून एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. लहान मुलगी आणि माकडाचा (Monkey) हा व्हिडिओ पाहून तुम्हालादेखील हसू आवरणार नाही. एकीकडे हा प्राणी आपल्यासाठी धोकादायक ठरू शकेल, अशी पुसटशी जाणीव या लहान मुलीला नाही, तर दुसरीकडे माकड या लहान मुलीला काहीही त्रास देताना दिसत नाही. हे दोघं एकमेकांशी केवळ मोबाइलवरून (Mobile) भांडताना दिसत आहेत.

    हे ही वाचा-तरुणानं मगरीच्या जबड्यात घातला हात; चवताळलेल्या मगरीनं केला हल्ला अन्.., VIDEO

    माकडानं हिसकावून घेतला हातातला फोन

    हा व्हिडिओ jagadeeshmadinenimadineni या इन्स्टाग्राम अकाउंटवरून (Instagram Video) शेअर केला गेला आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी घराबाहेर एका कॉटवर बसलेली दिसत आहे. तिच्या हातात मोबाइल फोन असून, ती त्याच्याशी खेळत आहे. याचदरम्यान अचानक एक माकड त्या ठिकाणी येतं आणि त्या लहान मुलीच्या हातातला फोन हिसकावून घेऊन फोनकडे पाहू लागतं; पण ती लहान मुलगीदेखील काही कमी नव्हती. आपली वस्तू दुसऱ्याच्या हातात गेलेली पाहताच ती त्याच्या हातातून फोन ओढून घेते. हे पाहून माकड पुन्हा फोन हिसकावून घेतं. जणू काही हे माकड त्या लहान मुलीला 'जास्त काळ फोन पाहणं वाईट आहे,' अशी शिकवण देत आहे, असं दिसतं.

    व्हिडिओला मिळतेय तुफान पसंती

    हा व्हिडिओ जो कोणी पाहतो, त्या व्यक्तीला क्षणभर का होईना पण हसू आवरत नाही. या व्हिडिओला इन्स्टाग्रामव्यतिरिक्त वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरही (Platforms) पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. 1 लाख 37 हजारांपेक्षा अधिक लाइक्स (Like) या व्हिडिओला मिळाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट्सचा (Comments) अक्षरशः पाऊस पडत आहे. अनेक लोकांनी हा व्हिडिओ मजेदार आणि सुंदर असल्याचं म्हटलं आहे. एका युझरने या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिलं आहे, की `फोन मुलांसाठी नाही, असा संदेश हे माकड देत आहे.`

    First published:
    top videos

      Tags: Internet, Social media, Viral, Viral video on social media