माकडालाही आवरला नाही सेल्फीचा मोह; तरुणाचा फोन पळवून काढले भन्नाट PHOTOS

माकडालाही आवरला नाही सेल्फीचा मोह; तरुणाचा फोन पळवून काढले भन्नाट PHOTOS

झोपलेल्या तरुणाचा माकडानं पळवला फोन; जंगलात जाऊन काढले सेल्फी, पाहा PHOTOS

  • Share this:

मुंबई, 16 सप्टेंबर : माकड हे माणसाच्या हुबेहुब नकला करतं ही गोष्ट आतापर्यंत ऐकली असेल. पण माकडही माणसासारखं हुशार असतं हे अनेक कथांमधून किंवा अनुभवांमधून समोर येतं. एका हुशार माकडाचे काही सेल्फी सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय बनले आहेत.

या माकडालाही माणसाप्रमाणे सेल्फीचा मोह आवरला नाही म्हणून त्यानं एका तरुणाचा फोन चोरून जंगलात फरार झाला. या माकडानं जंगलात जाऊन त्याने स्वत:चे सेल्फी आणि अनेक फोटो काढले. ही घटना समोर कशी आली आणि नेमकं काय घडलं जाणून घेऊया.

एक तरुणाचा फोन चोरीला गेल्याचं समोर आलं. शुक्रवारी त्यानं काम आटपून फोन घरात ठेवला आणि तरुण झोपायला गेला. शनिवारी सकाळी पाहातो तर फोन गायब झाला होता. त्यानं सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला मात्र कुठेच पत्ता लागेना. अखेर त्यानं फोन हरवल्याची तक्रार दाखल केली.

शेवटच्या वर्षात कंप्युटर सायंन्स शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचा फोन अचानक हरवल्यानं खूप गोंधळ उडाला होता. त्यानंतर या तरुणानं आपला फोन ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला आपल्या घरामागच्या जंगलात हा फोन असल्याची माहिती मिळाली. त्यानं तातडीनं त्या दिशेनं जाऊन आपला फोन सापडतो का याचा शोध घेतला.

या तरुणानं आपल्या फोनवर फोन केला तर जंगलातून आवाज येऊ लागला. अखेर या तरुणाला जंगलात एका झाडाजवळ फोन मिळाला. त्याने फोन उघडून पाहिले आणि हैराणच झाला. या फोनमध्ये माकडांचे अनेक सेल्फी आणि व्हिडीओ शूट केलेले त्याला दिसले. त्यातल्या एका व्हिडीओमध्ये तर माकड हा फोन चावण्याचा प्रयत्न करत असल्याचंही दिसलं. हा संपूर्ण प्रकार मलेशियातील तरुणानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. माकडांचे हे सेल्फी तुफान व्हायरल होत आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 17, 2020, 4:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या