मराठी बातम्या /बातम्या /Viral /

काय सांगता! माकडानं केला मेट्रोनं प्रवास; मोफत सवारीचा आनंद लुटतानाचा VIDEO VIRAL

काय सांगता! माकडानं केला मेट्रोनं प्रवास; मोफत सवारीचा आनंद लुटतानाचा VIDEO VIRAL

मेट्रोमधील लोक त्यावेळी हैराण झाले जेव्हा कोचमध्ये एक माकड आलं (Monkey Takes Free Ride in Metro). हे माकड मध्येच कोचमध्ये फिरायचं तर मध्येच लोकांशेजारी सीटवर येऊन बसायचं.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 20 जून : मेट्रोमध्ये कित्येक लोक रोज प्रवास करत असतात. त्यामुळे, एखाद्या माणसानं मेट्रोनं प्रवास केला, तर त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही. मात्र, याच मेट्रोनं एखाद्य माकडानं प्रवास केला तर? नक्कीच हे दृश्य पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हेच दृश्य प्रत्यक्षात पाहायला मिळालं, ते दिल्ली मेट्रोमध्ये. मेट्रोमधील लोक त्यावेळी हैराण झाले जेव्हा कोचमध्ये एक माकड आलं (Monkey Takes Free Ride in Delhi Metro). हे माकड मध्येच कोचमध्ये फिरायचं तर मध्येच लोकांशेजारी सीटवर येऊन बसायचं. मेट्रोमधील माकडाच्या सवारीचा हा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.

VIDEO: चिमुकल्याचा उदारपणा! गरीब मुलाला दिली स्वतःची खेळणी, मिळून खाल्ले चिप्स

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिल्ली मेट्रोमध्ये एक माकड लोकांसोबत प्रवास करताना दिसतं. ज्या मेट्रोमध्ये हे माकड प्रवास करत होतं, ती मेट्रो आनंद विहार येथून द्वारकाकडे चालली होती. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हे माकड एका व्यक्तीच्या शेजारी सीटवर बसतं आणि मग मेट्रोच्या काचांमधून बाहेरचं दृश्य पाहून त्याचा आनंद घेतं. शेजारी बसलेल्या व्यक्तीसोबत ओळख असल्याप्रमाणं ऐटीत ते बसलेलं दिसतं.

कुत्रा जोमात, बिबट्या कोमात, बंगल्यात आला अन् भिंतीवरून उडी टाकून पळाला, VIDEO

या माकडाला मेट्रोमध्ये फिरताना पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही थक्क झाले. हे माकड आतमध्ये नेमकं आलं कसं, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे समजू शकलेलं नाही. मेट्रोमधूनच प्रवास करणाऱ्या एक व्यक्तीनं हा व्हिडिओ शूट केला आहे आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Metro, Viral videos