Home /News /viral /

समोर साप दिसताच माकडाला फुटला घाम; बचावासाठीची धडपड पाहून आवरणार नाही हसू, VIDEO

समोर साप दिसताच माकडाला फुटला घाम; बचावासाठीची धडपड पाहून आवरणार नाही हसू, VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक माकड रस्त्याच्या कडेने जात असतं. इतक्यात त्याची नजर एका कापडावर पडते. उत्सुकतेपोटी माकड लगेचच तिथे जाऊन हे कापड उचलतं

  नवी दिल्ली 06 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रँक व्हिडिओ व्हायरल (Viral Prank Videos) झाल्याचं पाहायला मिळतं. याच कारणामुळे प्रँक व्हिडिओ बनवण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. हा एक असा कंटेंट आहे, जो यूजर्सच्या चांगलाच पसंतीस उतरतो. यातील काही व्हिडिओ इतके खास असतात की ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही व्हिडिओ खळखळून हसवणारे. सध्या असाच एक प्रँक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की माकडाच्या बहुतेक सवयी या माणसांप्रमाणेच असतात. माकडंदेखील माणसांप्रमाणेच प्रत्येक नवीन गोष्ट जाणून आणि समजून घेण्यास उत्सुक असतात. नवीन वस्तू समोर दिसताच ते उघडून पाहण्यास सुरुवात करतात. मात्र, अनेकदा हीच सवय त्यांना चांगलीच महागात पडते. सध्या असाच एक व्हिडिओ (Funny Video of Monkey) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक माकड रस्त्याच्या कडेने जात असतं. इतक्यात त्याची नजर एका कापडावर पडते. उत्सुकतेपोटी माकड लगेचच तिथे जाऊन हे कापड उचलतं. या कापडाखाली एक नकली साप असतो. साप पाहताच माकड इतकं घाबरत की ते उडी मारून तिथून पळ काढतं. सोशल मीडियावर या व्हिडिओला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, हा व्हिडिओ पाहून मला हसू आवरत नाहीये. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, माकड ज्या पद्धतीने घाबरलं ते अतिशय मजेशीर आहे. आणखी एकाने लिहिलं, मालकाने हे करायला नको होतं. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
  हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर wonderfuldixe नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यासोबतच त्यांनी मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. बातमी देईपर्यंत व्हिडिओला 53 लाखहून अधिक लाईक आणि करोडो व्ह्यूज मिळाले आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Funny video, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या