मराठी बातम्या /बातम्या /Viral /आरशात स्वतःला बघताच माकडाची मजेशीर रिअ‍ॅक्शन; VIDEO पाहून खळखळून हसाल

आरशात स्वतःला बघताच माकडाची मजेशीर रिअ‍ॅक्शन; VIDEO पाहून खळखळून हसाल

या मजेशीर व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक माकड बाईकच्या आरशात स्वतःला पाहत आहे. क्लिपमध्ये माकड बाईकवर बसून मजा घेताना दिसत आहे.

या मजेशीर व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक माकड बाईकच्या आरशात स्वतःला पाहत आहे. क्लिपमध्ये माकड बाईकवर बसून मजा घेताना दिसत आहे.

या मजेशीर व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक माकड बाईकच्या आरशात स्वतःला पाहत आहे. क्लिपमध्ये माकड बाईकवर बसून मजा घेताना दिसत आहे.

नवी दिल्ली 17 ऑक्टोबर : माणसांना आरशात पाहायला भरपूर आवडतं. अनेकदा लोक स्वतःला आरशात पाहत हावभावही देत असतात. मात्र, फक्त माणसंच नाही तर प्राणीदेखील यात मागे नाहीत. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका माकडाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Funny Video of Monkey) होत आहे. यात हे माकड एका गाडीवर बसल्याचं दिसतं. माकड स्वतःला गाडीच्या आरशात पाहात आहे. खास बाब म्हणजे स्वतःला आरशात पाहून हे माकड चेहऱ्यावर अजब हावभावही देत आहे. या व्हिडिओला सोशल मीडिया यूजर्सची (Social Media Users) भरपूर पसंती मिळत आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

रस्त्यावरुन जाताना महिलेच्या खिशात व्यक्तीनं टाकली चिठ्ठी; वाचताच बसला धक्का

या मजेशीर व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक माकड बाईकच्या आरशात स्वतःला पाहत आहे. क्लिपमध्ये माकड बाईकवर बसून मजा घेताना दिसत आहे. गाडीच्या आरशात पाहत या माकडानं एका हाताने हँडल पकडला आहे. माकड स्वतःलाच आरशात पाहत आहे. काही वेळानं हे माकड काही क्षणासाठी थांबतं आणि अशा पद्धतीनं बघत राहातं, जणू आरशात त्याला दुसरं एक माकड दिसलं आहे. या भ्रमातच माकड स्वतःचं डोकं खाजवतं आणि निराश होऊन आरशालाच मारू लागतं.

हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सच्या भलताच पसंतीस उतरत आहे. अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, हे माकड किती स्मार्ट आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, केवळ माकडच नाही तर प्रत्येकच प्राणी स्वतःला आरशात पाहिल्यावर असंच करतो. आणखी एकानं लिहिलं, मला वाटतंय, या माकडाला डेटवर जायचं असेल. म्हणूनच आरशासमोर उभा राहून ते तयार होत आहे.

तरुणीच्या डान्स VIDEOचा सोशल मीडियावर धिंगाणा; रेल्वे स्टेशनवरच लगावले ठुमके

याआधी आणखी एक माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील या व्हिडिओत माकड व्हीआयपी लाउंजमध्ये फिरताना दिसलं होतं. या माकडानं आधी ज्यूस पिला आणि नंतर बार काउन्टरवर जेवणही खाल्लं. माकडाचं हे कृत्य पाहून तिथे उपस्थित काहींनी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

First published:
top videos

    Tags: Funny video, Other animal