• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • भक्तिरसात दंग झालं माकड, हातात करताल घेऊन करू लागलं भजन; पाहा VIDEO

भक्तिरसात दंग झालं माकड, हातात करताल घेऊन करू लागलं भजन; पाहा VIDEO

माकडाने भजनात तालात वाजवलं करताल.

 • Share this:
  मुंबई, 15 ऑक्टोबर : माकड (Monkey) म्हणजे खोडकर प्राणी, असं आपल्या मनात पक्कं झालं आहे. कारण जेव्हा कधीही पाहतो तेव्हा माकड (Monkey video)  कुणाला तरी त्रास देताना, कुणाच्या तरी खोड्या काढताना, जिथं तिथं थैमान घालताना दिसतं. माकड कधी शांत बसूच शकत नाही, असंच आपल्याला वाटतं. पण हा व्हिडीओ पाहिला तर माकडाबाबतचे तुमचेही विचार बदलतील (Monkey doing bhajan video) . एक माकड चक्क भक्तिरसात दंग झालं आहे. हातात वाद्यं घेऊन माकड भजन करताना दिसलं आहे. एका जागी शांत बसून माणसांसोबत माकड भजन करतो आहे. भजनात रमलेल्या या माकडाला पाहून आपल्यालाही मनाला एक वेगळीच शांती मिळते. कारण इतकं शांत माकड आपण कधीच पाहिलं नसेल. पंकज पाराशर फेसबुक युझरने आपल्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत पाहू शकता काही साधू एका ठिकाणी जमून भजन करताना दिसतं आहे. कुणी तबला वाजवतंय, कुणी झांज. एका साधूच्या मांडीवर एक माकड बसलं आहे, त्यानेही  आपल्या हातात करताल घेतलं आहे आणि ते आपल्या दोन्ही हातात धरून अगदी तालात वाजवताना दिसतं आहे. हे वाचा - मुलासोबत खेळण्यासाठी घरी आणला चिम्पांजी, आईचा लाडका काही महिन्यातच बनला माकड बऱ्याच मंदिरांबाहेर आपल्याला माकड दिसतात. मंदिराबाहेरील काही माकडांचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. ज्यात कधी माकड देवाच्या दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भक्तांना आपल्यालाही पाया पडायला लावतात आणि आशीर्वाद देतात. तर कधी ते हात पुढे करत आपल्याकडे देवाचा प्रसाद मागतात. मंदिरात देवाच्या भक्तीत तल्लीन झालेले असे माकड क्वचितच पाहायला मिळतात. हे वाचा - चवताळलेल्या हत्तीने सोंडेने हवेत उडवली कार; पाहा गजराजाच्या रूद्र अवताराचा VIDEO याआधी सांगतीत एका माकडाने हनुमान मंदिरात आपला जीव सोडला होता. मिरजमध्ये बजरंगबलीच्या (hanuman temple) भक्ताचं अनोखं रुप पाहण्यास मिळालं होतं.  मारुतीरायाला दंडवत घालत एका वानराने प्राण सोडले होते. गुंडेवाडी गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात ही घटना घडली होती. गावातील नागरिक मंदिरात बजरंगबलीची मनोभावे पूजा, आरती करत होते. यावेळी एक वानर थेट  मंदिरात आले आणि गाभाऱ्याच्या बाहेर दंडवत घालू लागले. दंडवत घातल्यानंतर आहे त्या ठिकाणीच त्या वानराने आपला जीव सोडला. ही घटना मंदिरात असलेल्या नागरिकानी मोबाईलमध्ये कैद केली. नागरिकांना देखील मंदिरात घडलेला हा प्रकार आश्चर्यकारक वाटला.
  Published by:Priya Lad
  First published: