मराठी बातम्या /बातम्या /Viral /माकडाला पतंग उडवताना कधी पाहिलंय? हा Video तुमचा दिवस बनवेल

माकडाला पतंग उडवताना कधी पाहिलंय? हा Video तुमचा दिवस बनवेल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

माणसाला पतंग उडवताना पाहिलं असेल, पण माकड पतंग उडवू शकतो यावर तुमचा विश्वास बसेल? मग हा Video पाहा

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 30 जानेवारी : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. इथे प्राण्यांपासून ते माणसांपर्यंत वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. हे व्हिडीओ कधी आपल्याला पोट धरुन हसायला भाग पाडतात. तर काही व्हिडीओ हे आपल्यासमोर उदाहरण म्हणून येतात.

सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ आपल्यासमोर आला आहे. जो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ एका माकडाचा आहे. त्यामध्ये तो असं काहीतरी करताना दिसत आहे. ज्यावर विश्वास ठेवणं देखील तुम्हाला अशक्य होईल.

हे ही पाहा : रस्त्यावर भिक मागणाऱ्या महिलेचं असं सत्य समोर, पाहून पोलिसही चक्रावले

हल्लीच मकरसंक्रांतीचा सण साजरा झाला आहे. या काळात लोक पतंग उडवतात. देशाच्या काही भागात अजून ही लोक पतंग उडवतात. तुम्ही माणसांना आवडीने पतंग उडवताना पाहिले असेल, पण तुम्ही माकडाला कधी पतंग उडवताना पाहिलंय का?

हो चक्क माकड पतंग उडवतोय, तोही एकदम माणसासारखा...

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लांब एका इमारतीच्या टॅरेसवर एक माकड पतंग उडवताना दिसत आहे. हा माकड आपल्या दोन्ही हातांनी पतंग उडवण्याची मजा घेत आहे. हा व्हिडीओ खूप दूरवरून रेकॉर्ड करण्यात आला आहे, मात्र एक माकड पतंग उडवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हा व्हिडीओ एका यूजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये माकड पतंगाची दोरी मागे खेचत पतंग आपल्या हातात घेऊ पाहात आहे. तर दुसरीकडे त्याचं वागणं पाहून दुसरीकडे व्हिडीओ काढत असलेली मुलं जोरजोरात ओरडत मजा घेत आहेत.

हा व्हिडीओ पोस्ट होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडता आहे. असं माकडाला पतंग उडवताना पाहाणं खरंच, आश्चर्यचकीत करणारं आहे.

First published:

Tags: Funny video, Monkey, Social media, Top trending, Videos viral, Viral