मराठी बातम्या /बातम्या /Viral /हिला डाला रे बाबा! एक घोट घेताच माकडाला डोळ्यांसमोर दिसले तारे; पाहा Funny Video

हिला डाला रे बाबा! एक घोट घेताच माकडाला डोळ्यांसमोर दिसले तारे; पाहा Funny Video

मुंबई, 25 नोव्हेंबर : तुम्ही कुठे फिरायला गेला असाल तर बहुतेक पर्यटनस्थळी माकडं (Monkey video) ही असतातच. या माकडांना माणसांच्या हातातल्या वस्तू पळवतानाही तुम्ही पाहिलं असेल. त्यानंतर ज्या पद्धतीने माणसं त्या वस्तूचा वापर करतात तशीच ही माकडंही त्या वस्तू वापरताना दिसतात. अशाच एका माकडाच्या हाती लागली ती कोल्ड ड्रिंकची बाटली (Monkey drinking cold drink video) पण त्याच्यासोबत जे घडलं त्यानंतर कदाचित हे माकडं पुन्हा त्या बाटलीकडे पाहणारही नाही.

सोशल मीडियावर (Social media) एका माकडाचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता एक माकड रेलिंगवर बसलं आहे. त्याच्या हातात कोल्ड ड्रिंकची बाटली आहे. बाटलीत थोडंसं कोल्ड ड्रिंक आहे. माकड बाटलीचं झाकण उघडून बाटली तोंडाला लावतो.

माकड कोल्ड ड्रिंकचा फक्त एक घोट पितो आणि त्यानंतर त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारख आहे.

हे वाचा - वाघाच्या मावशीचं खतरनाक रूप! मांजराने चक्क सापाला अक्षरश: चावून चावून खाल्लं

कोल्ड ड्रिंक प्यायलानंतर काय होतं ते आपल्याला माहितीच आहे. तसंच काहीसं या माकडासोबत घडलं. कदाचित हे माकड पहिल्यांदाज कोल्ड ड्रिंक प्यायलं असावा. कोल्ड ड्रिंक पिताच तो पूर्णपणे गार पडला. मेंदूला जोर का झटका लागावा आणि डोळ्यांसमोर तारे दिसावे असं तोंड त्याने हलवलं आणि दुसऱ्याच क्षणी त्याने ती बाटली फेकून दिली.

हे वाचा - 'ओह ओह जाने जाना...'वर आजोबांचा आपला जलवा; डान्स पाहून शर्टलेस सल्लूलाही विसराल

cloths_huttz इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. माकडाला नेमकं काय वाटत असावं याचाच अंदाज सर्वांनी लावला आहे. हिला डाला रे बाबा, बवाल चीज है बे सारा सिस्टम हिल जाता आहे, अशा मजेशीर कमेंट यावर येत आहेत.

First published:

Tags: Viral, Viral videos, Wild animal