नवी दिल्ली 01 नोव्हेंबर : म्हटलं जातं की माणूस आधी माकड होता. मात्र, पुढे त्याचा विकास झाला आणि तो माकडापासून माणूस बनला. याच कारणामुळे माकडांना माणसाचे पूर्वज म्हटलं जातं. माकडेही अनेकदा माणसांप्रमाणे हरकती करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर (Viral Video of Monkey) आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजेल की माणसात आणि माकडात काय समानता आहे.
व्हिडिओमध्ये दोन माकडं एकमेकांच्या शेजारी बसल्याचं दिसतं. यातील एक माकड अतिशय प्रेमाने आपल्या दुसऱ्या साथीदाराचे डोळे साफ करताना दिसतं. जंगलात शूट केला गेलेला हा दोन माकडांचा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे.
लग्नमंडपातच चढला नवरीचा पारा; पाहताच घाबरून नवरदेवानं केलं असं काही की.., VIDEO
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक माकड आपल्या साथीदाराच्या भुवया व्यवस्थित करत आहे. सुरुवातीला ते आपल्या जोडीराचे डोळे साफ करताना दिसतं. नंतर ते त्याच्या भुवया (Eyebrows) व्यवस्थित करतानाही दिसतं.
Shaping eyebrows for the festive season pic.twitter.com/ryR8x0gG3i
— Susanta Nanda IFS (@susantananda3) October 28, 2021
हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन (Twitter Account) शेअर केला आहे. या व्हिडिओ कॅप्शन देत त्यांनी लिहिलं, भुवया आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थित करताना. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 38 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. यासोबतच अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.
लॉलिपॉप खाऊन चिमुकलीची झाली भयंकर अवस्था; फोटो पाहून बसेल धक्का
या व्हिडिओवर यूजर्स मजशीर आणि वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरचं असं म्हणणं आहे, की यांनी तर ब्यूटिशियनलाही मागे सोडलं. हा व्हिडिओ उदाहरण आहे, की माकड माणसाप्रमाणेच हुशार आहे, सोबतच त्याला आयुर्वेदीक पद्धतीनं साफसफाई आणि उपचार करण्याच्या पद्धतीही माहिती आहेत. हा नैसर्गिक उपचार आहे. त्यांना जेव्हा एखाद्या गोष्टीची आवश्यकता असते, तेव्हा ते जंगलातूनच शोधून काढतात. दुसऱ्या एका यूजरनं म्हटलं, की तुम्ही माकडांना पाहून कधीच बोर होणार नाही. आणखी एकानं कमेंट करत म्हटलं की हे सलूनप्रमाणे दिसत आहे. ज्यात एक माकड दुसऱ्याला म्हणत आहे की मी तुझं स्टायलिंग करतो आणि तू माझं कर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video