मराठी बातम्या /बातम्या /Viral /Video : गावकऱ्यांच्या लाडक्या वानराचा मृत्यू, हिंदूधर्माप्रमाणे केल्या अंत्यविधी

Video : गावकऱ्यांच्या लाडक्या वानराचा मृत्यू, हिंदूधर्माप्रमाणे केल्या अंत्यविधी

वानराचा अंत्यविधी

वानराचा अंत्यविधी

या माकडाच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याची गावातून अंत्ययात्रा काढली आणि रितीरिवाजाप्रमाणे त्याचा अंत्यविधी देखील पार पडला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मालेगाव, बब्बू शेख, प्रतिनिधी : आपल्या आजूबाजूला प्राणी प्रेमींची कमी नाही. काही लोक कुत्रा पाळतात, तर काही मांजर, शिवाय गावाकडे गाय, बैल, बकरी यांसारखे प्राणी देखील पाळले जातात. लोकांना आपल्या पाळीव प्राण्यांशी खूपच जवळीक असते. एखाद्या माणसांप्रमाणे प्राण्यांना देखील आपल्या मालकाच्या भावना कळतात. जर घरातील प्राणी लांब गेला किंवा जगातून निघून गेला तर नक्कीच लोकांना दु:ख होतं.

काही लोक तर आपल्या आवडत्या प्राण्यांच्या विरहानंतर त्याच्या आठवणीत रडत असल्याचं देखील तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण हे सगळं एखाद्या कुटुंबा पुरतं असतं किंवा त्या प्राण्याला सांभाळणाऱ्या मालकाला दु:ख होतं, पण एक अशी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये एका माकडाच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावाला वाईट वाटलं आहे.

बिबट्या दररोज शेतात येऊन करतो काय? शेतकऱ्याने CCTV पाहिला आणि त्याला धक्काच बसला

इतकच नाही तर या माकडाच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याची गावातून अंत्ययात्रा देखील काढली आणि रितीरिवाजाप्रमाणे त्याचा अंत्यविधी देखील पार पडला.

ही घटना मालेगावातील टेहरे टोकडे भागातील आहे. येथे एका वृद्ध वानराचा मृत्यू झाला. ज्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसली. गावकरी सांगतात की सुमारे 10 ते 11 वर्षांपूर्वी हा माकड गावात आला होता, त्यावेळी कदाचित त्याच्या आईपासून त्याची ताटातूट झाली होती.

आई पासून दुरावलेल्या या वानराचा संभाळ करत ग्रामस्थांनी त्याला मायेची उब दिली. ग्रामस्थांचं प्रेम पाहून वानर जंगल विसरून टेहरे टोकड्याचा झाला होता. मात्र अचानक त्याची तब्ब्येत बिघडली ज्यामुळे तो 4 ते 5 तासांपासून पडून होता.

त्याची अशी अवस्था पाहून ग्रामस्थांनी तातडीने पशु पशु वैद्यकीय अधिकाऱ्याला बोलावले त्यांनी तपासणी केल्यानंतर या माकडाचे निधन झाल्याचे त्यांनी. ही गोष्ट कळताच संपूर्ण गावावर शोककाळा पसरली.

वानराला बजरंगबलीचे रूप मानले जाते त्यामुळे मग गावकऱ्यांनी हिंदू रितिरिवाजा प्रमाणे या वानराची अंत्ययात्रा काढून त्याचं अंत्यविधी केला. यावेळी संपूर्ण गाव उपस्थित होतं यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. वनराच्या निधनामुळे सकाळी गावातील एकाही घरातील चूल पेटली नव्हती. लाडक्या वानराला श्रद्धांजली देण्यासाठी गावात 11 दिवसाचा दुखावटा जाहीर करण्यात आला आहे.

First published:

Tags: Monkey, Shocking, Social media, Videos viral, Viral