Home /News /viral /

सलूनमध्ये जात माकडाने कापली दाढी; रूबाब पाहून व्हाल अवाक, पाहा मजेशीर VIDEO

सलूनमध्ये जात माकडाने कापली दाढी; रूबाब पाहून व्हाल अवाक, पाहा मजेशीर VIDEO

सोशल मीडियावर एका माकडाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात माकड सलूनमध्ये जाऊन दाढी करताना दिसतं

    नवी दिल्ली 03 डिसेंबर : माकडं ही माणसांची पूर्वज असल्याचं म्हटलं जातं. यांच्या हालचाली आणि बरीच कृत्य अगदी माणसाप्रमाणेच असतात. इतकंच नाही तर माकडांचे छंदही अगदी माणसांप्रमाणेच असतात. याच कारणामुळे माकडाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच व्हायरल होतात. अनेकदा हे व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण होतात तर अनेकदा हे व्हिडिओ असेही असतात की ते पाहताच हसू आवरणं अशक्य होतं. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात माकड खुर्चीवर बसलं असून न्हावी त्याची दाढी करत असल्याचं दिसतं. या मजेशीर व्हिडिओ (Funny Video of Monkey) लोक निरनिराळ्या कमेंट करत आहेत. सोशल मीडियावर एका माकडाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात माकड सलूनमध्ये जाऊन दाढी करताना दिसतं (Monkey in Salon). हे वाचून तुम्हीही नक्कीच हैराण झाला असाल की माकड दाढी कसं करू शकतं, तेही सलूनमध्ये जाऊन. मात्र, हे खरं आहे. आमच्याकडे एक असा व्हिडिओ आहे जो पाहून तुम्हालाही या गोष्टीवर विश्वास बसेल. ही व्हिडिओ क्लिप आयपीएस रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक माकड आरशासमोर खुर्चीवर चादर घेऊन बसलेलं दिसतं. न्हावी कंगव्याने अगदी या माकडाच्या चेहऱ्यावरील केस विंचरतो. यानंतर इलेक्ट्रिक ट्रिमरने ट्रीम करण्यास सुरुवात करतो. व्हिडिओमध्ये हे माकड अतिशय शांततेत बसलेलं दिसतं. तिथे उपस्थित असलेले इतर लोकही माकडाकडे अतिशय प्रेमाने पाहत आहेत आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत. याआधी कदाचितच तुम्ही माकडाला सलूनमध्ये पाहिलं असेल. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अनेकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Funny video, Video viral

    पुढील बातम्या