मराठी बातम्या /बातम्या /Viral /

उड्या मारता मारता 5 वाघांच्या तावडीत सापडलं माकड आणि...; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

उड्या मारता मारता 5 वाघांच्या तावडीत सापडलं माकड आणि...; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

सध्या एका माकडाचा व्हिडिओ व्हायरल (Monkey Video Viral) होत आहे. यात हे माकड एक-दोन नव्हे तर 5 वाघांच्या तावडीत सापडल्याचं पाहायला मिळतं

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 15 ऑगस्ट : माकड (Monkey) हा एक असा प्राणी आहे जो संपूर्ण जंगलभर उड्या मारताना आणि फिरताना दिसतो. माकडाचे अनेक मजेशीर व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर (Viral Videos of Monkey) पाहायला मिळतात. मात्र, हीच मस्ती त्यांच्या जीवावरही बेतू शकते. सध्या अशाच एका माकडाचा व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. यात हे माकड एक-दोन नव्हे तर 5 वाघांच्या तावडीत सापडल्याचं पाहायला मिळतं. हे माकड खाली पडलं, तर त्याचं या वाघांच्या तावडीतून वाचणं अशक्य आहे. VIDEO : ...अन् लग्नाआधीच नवरी-नवरदेवानं घेतली समुद्रात उडी; कारण ऐकून बसेल धक्का व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक माकड एका झाडाच्या एकदम लहान आकाराच्या फांदीला लटकलं आहे. खाली एक तलाव आहे आणि यातील पाण्यात पाच वाघ आहेत. हे वाघ माकड खाली पडण्याची वाट पाहत आहेत. यातील एक वाघ तर हवेत उड्या घेत माकडाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हा वाघ या प्रयत्नात यशस्वी ठरलेला नाही. माकड या वाघांच्या तावडीतून स्वतःला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. VIDEO : वडिलांनी केलेली मस्ती मुलाला पडली महागात; आईनं लाथ घालत काढलं बाहेर सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. याच कारणामुळे अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की या माकडाचा मृत्यू आज निश्चित आहे. तर, दुसऱ्या एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की आपलं उड्या मारण्याचं कौशल्य वापरून हे माकड आपला जीव वाचवू शकतं. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनं या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.
First published:

Tags: Shocking video viral, Video viral

पुढील बातम्या