व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती खाली बसली आहे. त्याच्याजवळ एक माकड आहे. ती व्यक्ती काहीतरी खाते आहे आणि माकड त्या व्यक्तीच्या हातातील खाणं हिसकावून घेतं. त्यानंतर ते आपल्या सायकलवर बसून जायला निघतं. हे वाचा - कोंबड्यालाही लागली दारूची चटक; पाण्याच्या ग्लासकडे ढुंकूनही पाहेना; Video viral माकडाने आपलं खाणं काढून घेतल्याने व्यक्तीला राग येतो. तो त्या माकडाला एक चापटी मारतो. आता कुणीतरी आपल्याशी पंगा घेतला आणि त्याला उत्तर देणार नाही ते माकड कसलं. खाणं हिसकावून गुपचूप आपल्या मार्गाने जाणाऱ्या माकडाला चापटी बसताच त्याची सटकते. माकड त्या व्यक्तीला लाथा मारतो. एका चापटीच्या बदल्यात तो दोन लाथा बरसवतो. माकडाशी पंगा घेणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडलेलं दिसतं आहे. हे वाचा - वेगानं धावत बिबट्यानं पाडला हरणाचा फडशा; शिकारीचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO hayatvahsh_official इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wild animal