• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अरे बापरे! माकडासमोर जाऊन केलं पाऊट; तरुणीसोबत जे घडलं ते पाहून हादराल; Video Viral

अरे बापरे! माकडासमोर जाऊन केलं पाऊट; तरुणीसोबत जे घडलं ते पाहून हादराल; Video Viral

माकडासोबत फोटो काढणं तरुणीला चांगलंच महागात पडलं.

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर : कुठे फिरायला गेलो की फोटो काढणं आलंच. बहुतेक पर्यटनस्थळी माकडं (Monkey video) असतात. त्यामुळे या माकडांसोबत (Monkey attack video) एक सेल्फी किंवा फोटा तर बनतोच. एका तरुणीने असाच प्रयत्न केला. माकडासोबत ती फोटो काढायला गेली (Selfie with monkey). फोटो काढताना तिने पाऊट केलं आणि त्यानंतर माकडाने तिच्यासोबत जे केलं ते पाहून तुम्ही हादरालच. माकडासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणीवर माकडाने भयंकर हल्ला हल्ला केला आहे. तरुणीने माकडासमोर जाऊन पाऊट केलं तेव्हा माकड चवताळलं आणि तिच्या अंगावर धावून आलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून अक्षरशः धडकीच भरेल. व्हिडीओत पाहू शकता तरुणी माकडाजवळ जाऊन फोटोसाठी पोझ देऊन उभी राहते. कुणीतरी समोरून तिचं फोटो काढते आहे. माकडाच्या जवळ ती जाते आणि आपली दोन बोटं दाखवत पाऊट करते. माकड तिच्याकडे पाहतं आणि तिच्यावर उडी घेतं. तिच्या खांद्यावर बसतं, तिचं नाक-तोंड दाबतं, केस खेचण्याचाही प्रयत्न करते. तरुणी किती तरी वेळ माकडाच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करते. पण माकडाने तिला इतकं घट्ट पकडलं आहे की तिला त्याच्या तावडीतून सुटताच येत नाही. हे वाचा - कधी मांसाहारी बकरी पाहिलीये का? हा VIDEO पाहून नेटकरी हैराण सुदैवाने माकडाला बांधलेलं आहे आणि तरुणीने आपल्या डोक्याभोवती स्कार्फ गुंडाळलेला होता. पण तरी माकडाने असा अचानक हल्ला केल्याने ती जबरदस्त घाबरली आहे.  videolucu.funny इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही दिवसांपूर्वीच असाच माकडासोबत सेल्फी घेणाऱ्या तरुणाचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये माकडाने त्या तरुणावर असाच हल्ला केला होता. व्हिडीओत पाहू शकता माकड एका ठिकाणी शांत बसलं आहे. तरुण त्या माकडाजवळ जातं आणि फोटो काढत असतो. तो पोझ देऊन फोटो काढायला तयार असतो. माकडाचं त्या तरुणाकडे लक्ष नाही आहे. ते त्याच्याकडे पाठ करून बसलं आहे. इतक्यात दुसऱ्या बाजूने एक व्यक्ती येते आणि ती माकडाच्या पाठीवरून हात फिरवतं. आपल्याला कुणीतरी स्पर्श केला म्हणून माकड मागे वळून पाहतं,  ते खूप रागात असतं. त्याचवेळी त्याच्यासोबत फोटो काढणारा तरुणही त्याच्याकडे पाहतो. तेव्हा त्या दोघांच्या आजूबाजूला दुसरं कुणीच नसतं. त्यामुळे त्या तरुणानेच आपल्याला छेडलं असं समजून माकड त्याच तरुणावर हल्ला करतो. माकड तरुणाच्या हाताला पकडतो आणि जोरात चावतो. हे वाचा - चोचीत ड्रोन धरून आकाशात फडफडत राहिला पक्षी आणि... पुढे काय घडलं पाहा VIDEO videolucu.funny  इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून धक्काही बसतो पण हसूही आवरत नाही. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: