• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • छोट्याशा मुंगसापुढे विषारी सापाला मानावी लागली हार, पाहा लढाईचा थरारक VIDEO

छोट्याशा मुंगसापुढे विषारी सापाला मानावी लागली हार, पाहा लढाईचा थरारक VIDEO

नुकताच एक साप आणि मांजर यांच्यातील लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता

 • Share this:
  हरदोई, 14 डिसेंबर : नुकताच एक साप आणि मांजर यांच्यातील लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मांजराला सापासमोर सपशेल हार मानावी लागली होती. तर मुंगुस आणि साप यांचं वैर तर जन्मोजन्मीच. साप दिसला तरी मुंगुस त्याच्यावर हल्ला करतं. साप कितीही मोठा आणि लांब असला तरी मुंगुंसासमोर सहजा सहजी हार मानत नाही मात्र मुंगुस छोटा असल्या तरी सापाला पळवून लावण्यात अपयशी ठरतो. साप आणि मुंगूस यांचे वैर खूप जुने आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई शहरातील कोतवाली परिसरातील बावन रोडवर अनेकांनी हे दृश्य पाहिले. रविवारी दुपारी साप-मुंगूस येथे जोरदार लढाई झाली. लांब आणि विषारी असणाऱ्या सापाला मुंगसाच्या पिल्लानं अगदी मेटाकुटीला आणलं. बराच वेळ चालेल्या या लढाईत अखेर मुंगूस जिंकलं ही लढाई पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. हे वाचा-2020 सालचे काही Viral Video, ज्यामुळे कोरोनाकाळातही आपल्या चेहऱ्यावर हसू आलं या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की साप मुंगसाच्या उंचीपेक्षा उंच उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यावर प्रतिवार करत आहे. मात्र मुंगूस सगळे हल्ले चुकवून पुन्हा सापावर हल्ला करतो. सापाच्या उंचीएवढं होण्याचा प्रयत्न करतो. त्याचं डोकं पकडून त्याला खाली आदळण्याचा प्रयत्न करतो आणि मुंगसाला यामध्ये यश येतं. साप आणि मुंगूस यांची ही लढाई पाहण्यासाठी लोक रस्त्यावर जमले होते. सर्प मुंगूसची लढाई ही लढाई पाहून काळजाचा ठोका एक क्षणासाठी चुकेल. असे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर अनेक पाहिले असतीलही पण हा व्हिडीओ खास आहे. कारण मुंगसाच्या पिल्लानं भल्यामोठ्या सापाला हरवलं आहे.
  Published by:Kranti Kanetkar
  First published: