मुंबई, 29 मार्च : सोशल मीडियावर अनेकदा प्राणी-पक्ष्यांचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात त्या प्राण्यांचा निरागसपणा, स्मार्टनेस, हुशारी पाहून थक्क व्हायला होतं. प्राणी-पक्ष्यांचे व्हिडिओज सोशल मीडियावर कायमच हिट असतात. (viral video)
अनेक व्हिडिओज मनोरंजक असतात तर काही व्हिडिओजमधील प्राण्यांचं हिंस्त्र रूप एकदम घाबरवणारंही असतं. सध्या सोशल मीडियावर एक मुंगुसाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. तो पाहून तुम्हाला खूपच मजा येईल. या मुंगसाची हुशारी खरोखर कमालीची जास्त आहे. (mongoose viral video)
अनेकदा माणसाला वाटतं, की तोच खूप बुद्धिमान आहे. अगदी तोच उत्कृष्ट अभिनयही करू शकतो. मात्र असं नाही. प्राणीही या सगळ्यात एकदम कुशल असतात. याची सत्यता सिद्ध करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
हेही वाचा भूतानची ही स्मार्ट चिमुरडी भारताला म्हणाली 'शुक्रिया', व्हायरल झाला निरागस VIDEO
हा व्हिडिओ आहे एक हॉर्नबिल आणि एका मुंगुसाचा. (funny video of mongoose and hornbill)
View this post on Instagram
मुंगूसाची हुशारी पाहून तुम्हाला एकदमच आश्चर्य वाटेल. अगदी तुम्ही लहानपणी केलेल्या खोड्याही तुम्हाला आठवतील. इन्स्टाग्रामवर wildlife 2.0 नं शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दोन मुंगूस हॉर्नबिलच्या मागे चालताना दिसत आहेत. त्यातलंच एक मुंगूस हॉर्नबिलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतं. मात्र हॉर्नबिल मागं वळताच मुंगूस एकदमच मरण्याचा अभिनय करू लागतो. (mongoose acts like dead viral video)
हेही वाचा मगर आणि शार्कनं एकत्र लुटला नदीत पोहण्याचा आनंद, पाहा दुर्मीळ VIDEO
हॉर्नबिल आपल्यावर हल्ला करेल की काय या भीतीनं मुंगूस मरण्याचा अभिनय करू लागतो. व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हच्याही भुवया उंचावतील. एक मुंगूस इतकं स्मार्ट कसं असू शकतं हा विचार तुम्ही कराल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral video., Wild animal