मराठी बातम्या /बातम्या /Viral /केसांचा रंग बदलताच पालटलं मॉडेलचं नशीब; रातोरात झाली लोकप्रिय, आता कमवते बक्कळ पैसे

केसांचा रंग बदलताच पालटलं मॉडेलचं नशीब; रातोरात झाली लोकप्रिय, आता कमवते बक्कळ पैसे

डॅनी बँक्स (Danii Banks) अनेक वर्षांपासून इन्स्टाग्राम मॉडेलिंगमध्ये (Instagram Model) आपलं नशीब आजमावत होती. मात्र, तिला काही विशेष यश मिळत नव्हतं.

डॅनी बँक्स (Danii Banks) अनेक वर्षांपासून इन्स्टाग्राम मॉडेलिंगमध्ये (Instagram Model) आपलं नशीब आजमावत होती. मात्र, तिला काही विशेष यश मिळत नव्हतं.

डॅनी बँक्स (Danii Banks) अनेक वर्षांपासून इन्स्टाग्राम मॉडेलिंगमध्ये (Instagram Model) आपलं नशीब आजमावत होती. मात्र, तिला काही विशेष यश मिळत नव्हतं.

नवी दिल्ली 28 सप्टेंबर : आयुष्यात कधी कोणतं नवं वळण येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. अमेरिकन इन्स्टाग्राम मॉडेल डॅनी बँक्स (Instagram model Danii Banks) हिलादेखील या गोष्टीचा अंदाज नव्हता, की एक मेकओव्हर तिला यशाच्या शिखरावर पोहोचवेल (Makeover gives Success). तिनं आपल्या केसांना ब्लिच करून त्यांचा रंग काढून टाकला. मात्र, हेच आपल्या आयुष्यात एक वेगळं वळण घेऊन येईल, याची तिनं कल्पनाही केली नव्हती.

काय सांगता! आता टॉयलेटमध्येही असणार कॅमेरे? शास्त्रज्ञांनी सांगितले फायदे

डॅनी बँक्स (Danii Banks) अनेक वर्षांपासून इन्स्टाग्राम मॉडेलिंगमध्ये (Instagram Model) आपलं नशीब आजमावत होती. मात्र, तिला काही विशेष यश मिळत नव्हतं. डॅनीचं असं म्हणणं आहे, की जेव्हा तिनं आपल्या केसांचा रंग बदलण्याचं बोल्ड पाऊल उचललं तेव्हा तिचा हा निर्णय अतिशय फायदेशीर ठरला. यामुळे तिला लोकांकडून अधिक अटेन्शन मिळू लागलं आणि तिच्या कमाईतही मोठी वाढ झाली. यानंतर डॅनीनं आपला नॅचरल ब्रूनेट हेअर कलर (Brunette Hair) कायमस्वरुपीच ब्लॉन्डमध्ये रिप्लेस (blonde hair) केला.

United States च्या Florida मध्ये राहणारी डॅनी बँक्स सांगते, की तिला ब्लॉन्डर हेअरमुळे प्रचंड यश मिळालं. आता तिला आपल्या केसांचा हा रंग आवडतो, कारण यात ती अधिक बोल्ड आणि सुंदर दिसते. तिनं आपले केस ब्लिच केल्यानंतर लोकांनी तिला अधिक नोटीस केलं. आता अनोळखी लोकही तिच्याकडे पाहून चेहऱ्यावर हास्य आणतात. तिला सगळ्याच वयातील लोकांकडून अटेन्शन मिळतं. केवळ पुरुषच नाही तर महिलाही तिच्यासोबत बोलण्यासाठी उत्सुक असतात.

नवरीसाठी स्टेजरवरच केलं हे काम; नवरदेवानं जिंकली सगळ्यांची मनं, पाहा खास Video

डॅनी सांगते, की तिनं आपला लूक बदलल्यानं लोकांना तिच्यात अधिक इन्टरेस्ट आला आहे. कधी कधी वाईट उद्देशानंही लोक तिच्याकडे आकर्षित होतात. आता इन्स्टाग्रामवर डॅनीचे 6.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती सांगते, की तिच्या लुकमुळे अनेकदा लोक तिला वेडंही समजतात. ती स्वतःही लोकांसोबत निरनिराळे प्रँक करत मजा घेते. डॅनीशिवाय इतरही असे अनेक इन्स्टाग्राम एनफ्लुएन्सर्स आहेत ज्यांनी ब्लॉन्ड लुकमुळे करिअरमध्ये यश मिळवलं आहे.

First published:
top videos

    Tags: Model, Viral news