मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Mobile Hall Video : खूप म्हणजे खूप वेगळा आहे हा हॉल, आनंद महिंद्राही इम्प्रेस; तुम्हीही कधीच पाहिला नसेल

Mobile Hall Video : खूप म्हणजे खूप वेगळा आहे हा हॉल, आनंद महिंद्राही इम्प्रेस; तुम्हीही कधीच पाहिला नसेल

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या हॉलच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या हॉलच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या हॉलच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 26  सप्टेंबर : तशा तुम्ही बऱ्याच पार्ट्यांना, लग्नाला गेला असाल. बंदिस्त हॉलमध्ये किंवा मोकळ्या लाँजमध्ये असे कार्यक्रम पाहिले असतील. अशाच एका हॉलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा हॉल इतका खास आहे की, अगदी उद्योगपती आनंद महिंद्राही हा हॉल पाहून इम्प्रेस झाले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक भलामोठा ट्रक रस्त्याने चालताना दिसतो आहे. आता ट्रक पाहिला की यात वजनदार सामान असावं, म्हणजे मालवाहू ट्रक वाटतो. आता आपण हॉलबाबत बोलत आहोत, त्यामुळे तुम्हाला यात हॉलचं काही सामान असावं असं वाटेल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल हा ट्रक म्हणजेच हॉल आहे. काय विश्वास बसत नाही? ही काही अतिशयोक्ती वाटत असेल तर बिलकुल नाही.

हे वाचा - Maa Robot Video : बायको आजारी म्हणून दिव्यांग लेकीला दिली अशी आई; मजूर बाबाचा आविष्कार पाहून भलेभले थक्क

व्हिडीओ तुम्ही पाहिला तर ट्रक एका ठिकाणी थांबतो. त्यानंतर ट्रकवरील एकएक पार्ट वेगळा केला जातो आणि पाहता पाहता आलिशान हॉल तयार होतो. 40×30 स्क्वेअर फिटचा हा हॉल आहे. एका गाडीवर हा अख्खा हॉल आहे. ट्रकच्या आतच हॉलचं पूर्ण फर्निचर आहे.  तुम्हाला आश्चर्य वाटेल पण यात तब्बल 200 लोक मावू शकतात. म्हणजे इतक्या लोकांना तुम्ही लग्न, किंवा पार्टीला बोलवणार असाल तर हा हॉल तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

हॉलच्या आतून पाहाल तर हा हॉल एखाद्या ट्रकवर उभा आहे, यावर विश्वासही बसणार नाही. फक्त हॉल बनवून दाखवलेलाच नाही तर यात लग्नही होताना दिसतं आहे.   मोबाईल क्लिनिक, मोबाईल टॉयलेटनंतर आता मोबाईल हॉलही आला आहे. तुम्हाला जिथं हवा तिथं हा हॉल येईल.  कोणत्याही पर्मंनंट जागेची गरज नाही किंवा मंडप वगैरे बनवण्याची  झंझट नाही. बस्सं काही मिनिटांतच हा हॉल बनून तयार होतो.

हे वाचा - आपल्या गाण्याने महाराष्ट्राला वेड लावलेल्या जयेशचं बदललं आयुष्य, Video Viral झाल्यानंतर अशी आहे परिस्थिती

लग्न आणि पार्टी म्हटलं की हॉल लागतोच आणि हॉल बुकिंग हेच महत्त्वाचं आणि कठीण असं काम. त्यामुळे तुम्हाला जिथं हवा तिथं हॉल मिळाला तर यापेक्षा अधिक चांगलं काय असेल. हीच गोष्ट प्रत्यक्षात साकारताना दिसते आहे. या हॉलची हटके आयडिया पाहून आनंद महिंद्राही इम्प्रेस झाले आहेत. ही भन्नाड आयडिया साकारणाऱ्याला भेटण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे

First published:

Tags: Viral, Viral videos