• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मोबाईल दुरुस्त करताना अचानक झाला स्फोट, पाहा अंगावर शहारे आणणारा दुर्घटनेचा LIVE VIDEO

मोबाईल दुरुस्त करताना अचानक झाला स्फोट, पाहा अंगावर शहारे आणणारा दुर्घटनेचा LIVE VIDEO

मोबाईल दुरुस्त करत असताना अचानक स्फोट झाला आणि तो स्फोट इतका भीषण होता की सगळ्या केबिनमध्ये पसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 • Share this:
  बिलासपूर, 16 ऑक्टोबर : मोबाईल चार्जिंगला असताना किंवा हिट झाल्यावर बऱ्याचदा फुटल्याचा घटना घडल्याचं ऐकलं आहे. मोबाईल दुरुस्त करत असताना अचानक स्फोट झाला आणि तो स्फोट इतका भीषण होता की सगळ्या केबिनमध्ये पसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या स्फोटात मोबाईल दुरुस्त करणारा थोडक्यात बचावला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना हिमाचल प्रदेशातील बिलासपूर शहरातील मुख्य बाजारपेठेत मोबाईल दुरुस्ती दुकानात एक मेकॅनिक मोबाईल रिपेअरिंग करीत होता. त्यावेळी मोबाइल फोनच्या बॅटरीमध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे दुकानात मोठी खळबळ उडाली. या घटनेत दुकानात मोठं नुकसान झालं नाही आणि दुकानदार वाचल्याचं माहिती मिळत आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचा-गवत खाण्यासाठी जिराफाचा जुगाड, 90 लाखांहून जास्त वेळा पाहिला गेला VIDEO या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता मोबाईल दुरुस्त करणारा दुकानदार मोबाईल उघडतो. त्यातली बॅटरी काढायला जातो आणि अचानक स्फोट होता. या स्फोटाचा धूर सगळ्या खोलीभर पसरतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दुर्घटनेत मोबाईल दुरुस्त करणाऱ्या गंभीर दुखापत झाली नाही आणि दुकानाचं नुकसानही झालं नाही. याआधी मंडी इथे मोबाईल फुटल्यामुळे एका मुलाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती. मोबाईल फुटण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. त्यामुळे तो जास्त तापणार नाही किंवा चार्जिंगला लावून फोनवर बोलणं टाळावं ज्यामुळे त्रास होऊ शकणार नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
  Published by:Kranti Kanetkar
  First published: