मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Mobile blast Video : बापरे! हातात घेताच मोबाईलचा झाला ब्लास्ट, तोंडावर उडाली आग; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

Mobile blast Video : बापरे! हातात घेताच मोबाईलचा झाला ब्लास्ट, तोंडावर उडाली आग; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

मोबाईलची बॅटरी काढताना तरुणाच्या हातातच मोबाईलचा स्फोट झाला.

मोबाईलची बॅटरी काढताना तरुणाच्या हातातच मोबाईलचा स्फोट झाला.

मोबाईलची बॅटरी काढताना तरुणाच्या हातातच मोबाईलचा स्फोट झाला.

  • Published by:  Priya Lad
भोपाळ, 18 ऑगस्ट : मोबाईल जो 24 तास आपल्यासोबत असतो. मोबाईल जितका आपल्या आयुष्यात महत्त्वाचा आहे, तितकाच तो जीवासाठी धोकादायकही आहे. मोबाईल ब्लास्ट झाल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. अशाच एका घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका तरुणाच्या हातातच मोबाईलाच ब्लास्ट झाला आहे. ही भयंकर दुर्घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Mobile blast video). मोबाईल रिपेअरिंग दुकानातील ही घटना आहे. दुकानातील तरुण मोबाईलची बॅटरी काढण्याचा प्रत्न करत होती त्याचवेळी मोबाईलचा स्फोट झाला आणि मोबाईलमधून निघालेली आग एका व्यक्तीच्या तोंडावर बसली. व्हिडीओत पाहू शकता एक तरुण मोबाईलच्या दुकानात आहे. एक व्यक्ती त्या दुकानात येतं. दोघंही आपसात बोलत असतात. त्यावेळी तरुण दुकानातील एक मोबाईल हातात घेतो आणि त्याची बॅटरी काढायला जातो. मोबाईलच्या मागील कव्हर उघडण्याचा तो प्रयत्न करत असतो तोच मोबाईलचा अचानक ब्लास्ट होतो. हे वाचा - मोबाइल फोनच्या बॅटरीचा स्फोट का होतो? कशी घ्याल खबरदारी? तरुणाच्या हातातच मोबाईलचा स्फोट होतो, मोबाईलमधून आग भडकताना दिसते. ही आग समोर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या तोंडावर बसते. ती व्यक्ती तशी जीव मुठीत धरून दुकानातून बाहेर पळते. तर तरुणही हातातील मोबाईल फेकून देतो. ब्लास्ट होताच तरुण लगेच हातातील मोबाईल आपल्यापासून दूर फेकतो म्हणून सुदैवाने त्याला काही झालं नाही आणि आग लगेच विझवल्याने काही मोठी दुर्घटनाही टळली. ही घटना मध्य प्रदेशच्या कनकीमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. @kumarayush084 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. मोबाईल ब्लास्ट होऊ नये म्हणून अशी घ्या खबरदारी 1. मोबाइलचा स्फोट होऊ नये यासाठी ओरिजिनल चार्जरनेच फोन चार्ज करा. 2. चार्जिंग करताना मोबाइलचा वापर टाळा 3. फोन गरम जागी ठेवू नका. हे वाचा - Smartphone Tips: स्मार्टफोन वापरताना कधीही करू नका या चुका; हातातच होईल ब्लास्ट 4. फोनची बॅटरी गरजेपेक्षा जास्त वेळ चार्ज करू नका. 5. फोन गरम होईल किंवा हँग होईल अशी अॅप्स इन्स्टॉल करू नका. 6. वेगाने चार्ज होणारे फोन खरेदी करू नका.
First published:

Tags: Viral, Viral videos

पुढील बातम्या