मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'या' देशातील मुलीशी लग्न केल्याने मुंबईचा तरुण मालामाल! सरकार देतंय दरमहा पैसे

'या' देशातील मुलीशी लग्न केल्याने मुंबईचा तरुण मालामाल! सरकार देतंय दरमहा पैसे

बाळाच्या संगोपणासाठी पैसे

बाळाच्या संगोपणासाठी पैसे

Mithilesh Backpacker: या लग्नानंतर या व्यक्तीला खूप पैसे मिळाले. याशिवाय नुकतेच त्याचे मूल जन्माला आल्यावर बेलारूस सरकारने नियमांतर्गत तीन वर्षांपर्यंत दरमहा पगार देण्याची तरतूदही केली.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 जानेवारी : सध्याच्या काळात विवाह जुळणं आणि टिकणं काहीसं अवघड बनलं आहे. अर्थात यामागे अनेक कारणं आहेत. काही विवाह जुळण्यामागे रंजक कहाण्याही असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून यापैकी काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. सध्या अशाच एका मुंबईकर युवकाच्या विवाहाची रंजक कहाणी चर्चेत आहे. या युवकाला विवाहानंतर मोठा आर्थिक फायदा झाल्याचं समजताच सोशल मीडियावर त्याचे फॉलोअर्स वाढले आहेत. हा युवक बेलारूसमधल्या युवतीशी विवाहबद्ध झाला. त्यानंतर या दाम्पत्याला मूल झाल्याने बेलारूस सरकारच्या नियमानुसार, त्याला एक लाख 28 हजार रुपये मिळाले असून, पुढील तीन वर्षांपर्यंत दरमहा 18 हजार रुपये बाळाच्या संगोपनासाठी त्याला मिळणार आहेत. या युवकाची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सोशल मीडियावर प्रेमविवाहासंदर्भातल्या अनेक कहाण्या नेहमीच व्हायरल होतात. वधू परदेशातली असेल, तर ती कहाणी अधिक रंजक ठरते. सध्या सोशल मीडियावर अशीच एका प्रेमविवाहाची कहाणी व्हायरल होत आहे. मुंबईतल्या मिथिलेश नावाच्या तरुणाचा विवाह बेलारूसमधल्या लिसा नावाच्या युवतीशी झाला. मिथिलेश ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. मिथिलेश आणि लिसाचा प्रेमविवाह झाल्यानंतर या दाम्पत्याने एका मुलाला जन्म दिला. मिथिलेश पिता बनल्यावर बेलारूसमधल्या कायद्यानुसार त्याला बाळाच्या संगोपनासाठी एक लाख 28 हजार रुपये मिळाले. तसंच पुढच्या तीन वर्षांसाठी त्याला दरमहा 18 हजार रुपये मिळणार आहेत. सध्या मिथिलेश आणि लिसाच्या प्रेमविवाहाची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेक जण मिथिलेशचं सोशल मीडिया अकाउंट फॉलो करत आहेत.

वाचा - 58 वर्षांपूर्वी घेतलेलं पुस्तक परत करण्यासाठी पोहचला 76 व्या वर्षी

मुंबईतला रहिवासी असलेला ट्रॅव्हल ब्लॉगर मिथिलेश बेलारूसच्या लिसाशी विवाहबद्ध झाला. या दोघांची पहिली भेट बेलारूसमध्ये झाली होती. मिथिलेश मार्च 2021मध्ये प्रथमच रशियाला गेला होता. तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला बेलारूसला येण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर मिथिलेश बेलारूसला गेला आणि तिथं त्याची लिसाशी पहिली भेट झाली. एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याची पहिल्यांदा लिसाशी भेट झाली. त्यांच्या पहिल्या भेटीची कहाणीदेखील रंजक आहे. एका ट्रान्सलेटरच्या संदर्भात हे दोघे भेटले. त्यानंतर त्यांचा एकमेकांशी संवाद वाढत गेला. त्या दोघांचा संवाद ट्रान्सलेटरच्या माध्यमातून होत असे. कारण लिसाला रशियन भाषा येत होती, तर मिथिलेश इंग्रजी भाषेतून संवाद साधत असे.

अनेक भेटींनंतर मिथिलेशनं लिसाला प्रपोज केलं आणि त्याच वर्षी दोघे विवाहबद्ध झाले. विवाहावेळी दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. विवाहानंतर मिथिलेश बेलारूसमध्ये राहू लागला. दोन महिन्यांपूर्वी या दाम्पत्याने बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर बेलारूस सरकार आपल्याला काही रक्कम देणार असल्याचं मिथिलेशनं त्याच्या यू-ट्यूब चॅनेलवर सांगितलं. त्यानुसार त्याला पुढच्या तीन वर्षांसाठी दरमहा 18 हजार रुपये बाळाच्या संगोपनासाठी मिळणार आहेत. त्यामुळे मिथिलेश आणि लिसाच्या प्रेमविवाहाची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Marriage