मराठी बातम्या /बातम्या /Viral /

80 फूट उंचावर बाल्कनीच्या रेलिंगवर तरुणी करत होती योगा; पाय घसरला आणि...

80 फूट उंचावर बाल्कनीच्या रेलिंगवर तरुणी करत होती योगा; पाय घसरला आणि...

 बाल्कनीच्या रेलिंगवर योगासनं करणं तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे.

बाल्कनीच्या रेलिंगवर योगासनं करणं तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे.

बाल्कनीच्या रेलिंगवर योगासनं करणं तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे.

    मेक्सिको, 30 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social Media) आपण प्रसिद्ध व्हावं यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपले असे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करायचे याकडे कल असतो. यासाठी जीवघेणे असे स्टंटही (Dangerous Stunt) केले जातात. असाच स्टंट करणं मेक्सिकोमधल्या (Mexico) 23 वर्षांच्या तरुणीला चांगलं महागात पडलं. 80 फूट उंचावर असलेल्या बाल्कनीच्या रेलिंगवर ती स्टंट करत होती आणि तिथून कोसळली. स्टंटचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अॅलेक्सा टेरेसस असं या तरुणीचं नाव आहे. ती सहाव्या मजल्यावर राहते. तिच्या बाल्कनीतल्या रेलिंगच्या आधाराने ती योगासनं करत होती. तिचा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रेलिंगवर उलटी लटकून ती स्टंट करत होती. त्यावेळी तिचा पाय सटकला आणि ती 80 फूट उंचीवरून खाली कोसळली. अपघातानंतर तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिच्यावर तब्बल 11 तास सर्जरी सुरू होती. एवढं होऊनही सुदैवाने तिचे प्राण वाचले. मात्र या अपघातामुळे तिला इतकी गंभीर दुखापत (Serious Injury) झाली आहे, की पुढची किमान तीन-चार वर्षं तरी ती चालू शकणार नाही. अपंगत्व तिच्या नशिबी आलं. अर्थात हे स्वतःहून ओढवून घेतलेलं संकट असल्यामुळे तिला चांगलाच धडा मिळाला. रेल्वेसमोरून उडी मारण्याचं फेसबुक लाइव्ह करणे किंवा गाडी चालवतानाचा व्हिडिओ स्ट्रीम करणं असले भलते उद्योग कोणी ना कोणी तरी करत असतं. स्वतः जखमी होत असतं किंवा जीव गमावत असतं, शिवाय दुसऱ्याचा जीवही टांगणीला लावत असतं. अशा स्टंटमुळे सोशल मीडियावर तात्पुरती प्रसिद्धी मिळते खरी पण 'सर सलामत तो पगडी पचास' या म्हणीनुसार आपला आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालून मिळवलेली प्रसिद्धी वाईटच. कारण कदाचित स्टंटच्या फोटोला किंवा व्हिडिओला खूप लाइक्स मिळतील. पण त्या स्टंटमुळे काही दुर्घटना घडली, तर साधी विचारपूस करायलाही यापैकी कोणीही येणार नाही, ही गोष्ट खरी. त्यामुळे सोशल मीडियावरच्या प्रसिद्धीचा हव्यास धरणं चूकच. हा धडा या निमित्ताने पुन्हा एकदा मिळाला आहे.
    First published:

    Tags: Yoga

    पुढील बातम्या