मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चिमुकलीनं वेटलिफ्टिंग करत मीराबाई चानूचंही जिंकलं मन; VIDEO VIRAL

चिमुकलीनं वेटलिफ्टिंग करत मीराबाई चानूचंही जिंकलं मन; VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Viral on Social Media) चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी मीराबाईप्रमाणंच बनण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 27 जुलै: टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) वेटलिफ्टिंगमध्ये दुसरा क्रमांक पटकावत भारताला रौप्य पदक (India won Silver at Tokyo) मिळवून दिलं आहे. यासोबतच ती देशातील कित्येकांची प्रेरणा बनली आहे. मीराबाईनं इतका संघर्ष करून ज्याप्रकारे हा विजय मिळवला तो एखादं स्वप्न सत्यात उतरण्यासारखाच आहे. चानू यंदा टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

अशात आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Viral on Social Media) चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी मीराबाईप्रमाणंच बनण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की ही चिमुकली वेटलिफ्टिंग (Weightlifting Video) करत आहे, तर तिच्या मागे असणाऱ्या टीव्हीवर मीराबाई चानू ऑल्मिपिकमध्ये मेडल जिंकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी ही चिमुकली वेटलिफ्टर सतीश यांची मुलगी आहे. मीराबाईकडून प्रेरणा घेत तीदेखील वेटलिफ्टिंग करत आहे.

दाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा

हा व्हिडिओ Sathish Sivalingam weightlifter यांनी शेअर केला आहे. सतीश यांनी वेटलिफ्टिंगमध्ये याआधीच भारताची मान उंचावली आहे. त्यांनी मुलीचा हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन शेअर करत लिहिलं, ज्युनिअर @mirabai_chanu. याला प्रेरणा म्हणतात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड होताच लोकांनी यावर कमेंट करण्यास सुरुवात केली. मीराबाई चानूनंही व्हिडिओ शेअर करत त्याला सुंदर कॅप्शन दिलं.

VIDEO: भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघं हवेत उडाले अन् दुसऱ्याच क्षणाला..

एका यूजरनं म्हटलं, की खरंच मीराबाई चानू आपल्या देशाचा अभिमान आहे. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की किती लहान मुलगी मीराबाई बनवण्याची स्वप्न पाहत आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे. इतरही अनेकांनी यावर कमेंट करत चिमुकलीचं कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. तर, 21 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

First published:

Tags: Olympics 2021, Video viral