भोपाळ, 4 ऑगस्ट : देशातील विविध राज्यांमध्ये पावसाने नागरिकांना हैराण केलं आहे. अनेक भागांमध्ये तर पूरजन्यपरिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे खूप हाल होत आहेत. येत्या काही दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचं धुमशान सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अशातच मध्य प्रदेशातील दातिया भागातून एक घटना समोर आली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या मंत्र्यांनाच मदतीची गरज लागल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
त्याचं झालं असं की, पूरग्रस्तांच्या भेटीसाठी मध्य प्रदेशातील एक मंत्री गेले होते. नरोत्तम मिश्रा हे बोटीतून कोटरा गावपर्यंत गेले होते. या भागात पहिल्या मजल्यापर्यंत पाणी जमा झाल्याचं दिसत आहे. हेलिकॉप्टरमधून पाहिलं तर लक्षात येईल की अख्खं गाव जलमय झालं आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या मंत्र्यांचंच करावं लागलं रेस्क्यू ऑपरेशन; पाहा Live Video. हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील दातिया भागातील आहे. pic.twitter.com/ED1oAttf8G
— News18Lokmat (@News18lokmat) August 4, 2021
#Datia विधानसभा क्षेत्र के कोटरा गांव में 9 लोगों के सिंध नदी की बाढ़ में फंसे होने की सूचना मिलते ही तत्काल बोट से मौके पर पहुंचा। यहां बाढ़ का पानी लोगों के घरों में दूसरी मंजिल तक पहुंच गया था। बाढ़ में फंसे लोगों को तत्काल वायुसेना के हेलिकॉप्टर से रेस्क्यू कराया। pic.twitter.com/eA4HQFnGO5
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) August 4, 2021
हे ही वाचा-9 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर काँग्रेसची पंतप्रधानांवर टीका
पूरग्रस्तांच्या भेटीसाठी मंत्रीसाहेब गावापर्यंत तर पोहोचले, मात्र येथून बाहेर पडणं इतकं सोपं नव्हतं. शेवटी मंत्रीसाहेबांना एका घराच्या छटावर नेण्यात आलं. तेथे ते हेलिकॉप्टरची वाट पाहत होते. शेवटी त्यांना वाचविण्यासाठी थेट हेलिकॉप्टरच बोलविण्यात आलं. यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरमधून सोडलेल्या दोरीला पकडलं आणि त्यांना वर खेचलं. अशा प्रकारे त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन करावं लागल्याचा प्रकार येथे घडला.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर टीकाही केली आहे. तर काहींनी पूरभागात परिस्थिती गंभीर असताना तेथे जाऊन काम वाढविण्याची गरज काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोण आहे नरोत्तम मिश्रा
नरोत्तम मिश्रा भारतीय जनता पक्षाचे नेते असून ते मध्य प्रदेशातील दतिया भागातून सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Rain flood