मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रुग्णालयात स्वतः फरशी साफ करताना दिसले कोरोनाबाधित ऊर्जामंत्री; सांगितलं यामागचं कारण, PHOTO VIRAL

रुग्णालयात स्वतः फरशी साफ करताना दिसले कोरोनाबाधित ऊर्जामंत्री; सांगितलं यामागचं कारण, PHOTO VIRAL

सध्या एका कोरोना रुग्णाचा (Corona Patient) फोटो चांगलाच व्हायरल (Photo Viral) होत आहे. हा रुग्ण रुग्णालयातील फरशी साफ करत असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 15 मे : सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका कोरोना रुग्णाचा (Corona Patient) फोटो चांगलाच व्हायरल (Photo Viral) होत आहे. हा रुग्ण रुग्णालयातील फरशी साफ करत असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. मात्र, या फोटोमध्ये दिसत असलेली व्यक्ती मिझोरम सरकारमधील मंत्री आर लालजिर्लियाना (R Lalzirliana) आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. हा फोटो व्हायरल देशभर सर्वच त्यांचं कौतुक करत आहेत. 71 वर्षाचे लालजिर्लियाना मिझोरम सरकारमध्ये ऊर्जामंत्री आहेत. फोटोमध्ये दिसत आहे, की ते रुग्णालयातील गाऊनमध्ये असून हातात पोछा घेऊन कोविड वार्डातील जमीन ते साफ करत आहेत. हा फोटो जोराम मेडिकल कॉलेजमधील असल्याचं म्हटलं जात आहे. तर, लालजिर्लियाना यांच्यावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रियाही दिली आहे. लालजिर्लियाना म्हणाले, की त्यांचा उद्देश रुग्णालयातील स्टाफला लाजवणं हा नव्हता. त्यांनी स्थानिक माध्यमांसोबत बोलताना सांगितलं, की वार्डातील सफाईसाठी त्यांनी सफाई कर्मचाऱ्याला बोलावलं होतं. मात्र, त्यानं काहीच प्रतिक्रिया न दिल्यानं मंत्र्यांनी स्वतःच सफाई करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, की झाडून घेणं किंवा घरातील काम करणं माझ्यासाठी नवीन नाही. ही कामं मी घरी किंवा जिथे गरज असेल तिथे करत असतो. त्यांनी असंही म्हटलं, की मंत्री आहे म्हणून मी स्वतःला इतरांपेक्षा वेगळं किंवा वरचढ समजत नाही. ते म्हणाले, की जमीन साफ करुन डॉक्टरांचा किंवा नर्सचा हलगर्जीपण दाखवणं, हा माझा उद्देश नव्हता. तर, मला इतरांनाही शिकवायचं होतं. पुढे ते म्हणाले, की दोन दिवस मिनी ICU मध्ये राहिल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांनी कोणतीही व्हीआयपी ट्रिटमेंट घेतली नाही. मेडिकल स्टाफ आणि नर्स चांगल्याप्रकारे काळजी घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री, त्यांची पत्नी आणि मुलगा आधीपासूनच होम आयसोलेशनमध्ये होते. मात्र, ऑक्सिजन पातळी खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
First published:

Tags: Coronavirus, Photo viral, Political leaders

पुढील बातम्या