नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : कोणाचं नशीब कधी आणि कशामुळे बदलेल हे कुणाला सांगता येऊ शकत नाही. अनेकवेळा विचार न केलेल्या गोष्टी घडतात अन् माणसाचं आयुष्य अगदी क्षणात बदलून जातं. असंच काहीसं एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या कचरा गोळा करणाऱ्यासोबत घडलं आहे. त्याला कचरा गोळा करताना असं काही सापडलं की त्याचं आयुष्यच बदलून गेलं.
कचरा गोळा करताना व्यक्तीला कचऱ्याच्या ठिकाऱ्यातून कोटींची वस्तू सापडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ब्रिटनमधील आहे. यूकेच्या केंटमध्ये राहणारा 47 वर्षीय मार्टिन लहानपणापासूनच डस्टबिनमधून वस्तू गोळा करायचा. पण, नंतर त्याने हे काम व्यवसाय म्हणून सुरु केले. अलीकडेच मार्टिनला डस्टबिनमधून नायकीज कंपनीचे शूज आणि आयफोनसह अनेक ब्रँडेड वस्तू सापडल्या. याविषयी माहिती समोर येताच सगळ्यांनाच आश्चर्यत वाटले. याशिवाय त्यांना कचऱ्याच्या ठिगाऱ्यातून मेकअपच्या काही गोष्टीही मिळाल्या ज्याची किंमत कोटींमध्ये आहे.
हेही वाचा - कळसुबाई शिखरावर ठेवलं चिमुकलीचं नाव; गिर्यारोहक दाम्पत्याचं थरारक पाऊल, पाहा Video
'द सन'शी बोलताना मार्टिनने सांगितले की, तो दर आठवड्याला 20 हजार ते 1 लाख रुपये कमावतो. मार्टिनच्या म्हणण्यानुसार, त्याला कचऱ्यात फक्त अशाच गोष्टी सापडतात ज्या सहज रिसायकल केल्या जातात, जसे की पुठ्ठा आणि प्लास्टिक. त्याला काही महिन्यांपूर्वी लाखो रुपयांची नेलपॉलिश मिळाल्याचंही त्यांनं सांगितलं. मार्टिनने सांगितले की, त्याचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आहे. डस्टबिनमधून जे मिळेल ते विकतात. वस्तूंच्या बदल्यात मिळालेल्या पैशातून तो आपल्या कुटुंबाला मगत करतो.
दरम्यान, हे सामान कोणी गहाळ केलं आहे यासाठी त्याने चौकशीही केली. मात्र याविषयी काहीच माहिती मिळाली नाही म्हणून त्याने त्या वस्तू विकल्या. याशिवाय तो बऱ्याच वेळा वस्तू दान करतो. ज्या लोकांना खरंच या गोष्टींची गरज आहे अशांना तो दान करतो. सध्या त्याला सापडलेल्या मौल्यवान गोष्टींमुळे तो चर्चेत आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Top trending, Viral, Viral news