कोट्यधीश महिलेने डॉल्फिनशी केलं लग्न; आता 'पती'च्या मृत्यूनंतर जगतेय विधवेचं आयुष्य

कोट्यधीश महिलेने डॉल्फिनशी केलं लग्न; आता 'पती'च्या मृत्यूनंतर जगतेय विधवेचं आयुष्य

कोट्यधीश महिला शेरॉन हिने इस्रायलमधल्या (Israel) एका सिंडी नावाच्या डॉल्फिन माशाशी (Dolphin Fish) लग्न केलं. तिनी अगदी त्यांच्या पद्धतीनुसार वेडिंग गाऊन घालून या सिंडीशी लग्न केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जून: कुणाशी प्रेम व्हावं आणि कुणी कुणाशी लग्न करेल हे काही सांगता येत नाही. ब्रिटनमधली कोट्यधीश महिला शेरॉन हिने इस्रायलमधल्या (Israel) एका सिंडी नावाच्या डॉल्फिन माशाशी (Dolphin Fish) लग्न केलं. शेरॉनचं सिंडी नावाच्या डॉल्फिनवर प्रेम होतं. त्यामुळे तिनी अगदी त्यांच्या पद्धतीनुसार वेडिंग गाऊन घालून या सिंडीशी लग्न केलं.

शेरॉन ब्रिटनमध्ये राहते (Britain) आणि इस्रायलमधला डॉल्फिन सिंडी तिला आवडायला लागला. सिंडीला भेटण्यासाठी ती वरचे वर इस्रायला जायला लागली. किती म्हणाल तर तब्बल 16 वर्षं ती त्याला भेटायला जायची. मग शेवटी तिनी वयाच्या 26 व्या वर्षी सिंडीशी लग्न करून त्याच्यासोबतच उर्वरित आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. इस्रायलकडून परवानगी मिळाल्यावर हा लग्न सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला होता. या लग्नावेळी शेरॉनने वेडिंग गाऊन (Wedding Gown) घातला होता. त्याचबरोबर तिनी सिंडीला आय लव्ह यू म्हटलं आणि प्रेमाने किसही केलं होतं. लग्नावेळी शेरॉन आणि सिंडी दोघंही खूप सुंदर दिसत होते आणि खूश होते. या लग्नाबाबत शेरॉन म्हणाली होती, ‘डॉल्फिनशी लग्न करणं हा काही माझा शौक नाही. स्रीला पुरुषाशीच प्रेम व्हावं असंच काही नाही. माझं डॉल्फिन सिंडीवर प्रेम आहे आणि आम्ही विवाह केल्याने मी खूप खूश आहे.’

(वाचा - VIDEO : नवरीची पाठवणी करताना घडला विचित्र प्रकार; नवरदेव पाणी पाणी झाला!)

शेरॉन झाली विधवा -

सिंडीच्या पोटात दुखायला लागलं आणि 2006 मध्ये सिंडीचा मृत्यू झाला. त्यानंतर शेरॉन विधवा (Widow) झाली. पतीच्या निधनानंतर शेरॉन खूप निराश झाली होती. या धक्क्यातून सावरायला तिला खूप वेळ लागला. शेरॉनच्या कुटुंबियांनी तिला दुसरं लग्न (Second Marriage) करायला सांगितलं पण तिने सांगितलं, की मी सिंडीची पत्नी आहे आणि त्याचीच राहणार. त्यामुळे शेरॉनबद्दल खूप चर्चा झाली होती. कोट्यधीश असूनही शेरॉनने दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला नाही.

(वाचा - बायकोच्या ओठाऐवजी भलतीकडेच KISS; कपलचा एक्सरसाइझ VIDEO पाहून हसू आवरणार नाही)

हे असं विलक्षण लग्न एकमेव नाही, तर या आधीही जगात अशी लग्न झाली आहेत. 2019 मध्ये तिला आयुष्यभर साथ देणाऱ्या गाढवाशी एका महिलेनी लग्न केलं होतं. तसंच इटलीमध्ये ब्रेकअपने निराश झालेल्या एका मुलीने मोठा लग्न सोहळा करून स्वत: शीच लग्न केलं होतं. एकाने डॉलशी लग्न केलं होतं. त्यामुळे जगभरात विलक्षण लग्न होतात ही गोष्ट नवी नाही. शेरॉननी पण माणूस जसा एकनिष्ठ राहतो तसंच डॉल्फिनशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला, याचं जगभर कौतुक झालं.

First published: June 25, 2021, 12:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या