मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: जगातील सर्वात तिखट मिरची खाल्ली 9.72 सेंकदात, वर्ल्ड रेकॉर्डही केला पण त्यानंतर...

VIDEO: जगातील सर्वात तिखट मिरची खाल्ली 9.72 सेंकदात, वर्ल्ड रेकॉर्डही केला पण त्यानंतर...

Mike jack

Mike jack

'घोस्ट पेपर' आणि 'भूट जोलोकिया' यासारख्या सर्वात लोकप्रिय प्रकारच्या मिरच्या सर्वात वेगवान खाणारा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या माईक जॅकने आणखी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला आहे.

कॅनडा, 04 फेब्रुवारी: सोशल मीडियावर (Social Media) विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. याचबरोबर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) देखील त्यांचे विविध रेकॉर्ड व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असतात. विविध प्रकारच्या या रेकॉर्डच्या काही व्हिडिओंवर विश्वास ठेवणे अवघड होते. अशा काही व्हिडीओंमध्ये खूपच अविश्वसनीय वर्ल्ड रेकॉर्ड देखील असतात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Records) त्यांच्या फेसबुक पेजवर अशाच पद्धतीचा जगातील सर्वात तिखट मिरची खाण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डचा व्हिडीओ शेअर केला आहे.

कॅनडामधील माईक जॅक (Mike Jack) या व्यक्तीने 9.72 सेकंदात जगातील सर्वात तिखट Carolina Reaper Chilli pepper खाऊन हा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हा रेकॉर्ड बनवण्यासाठी या व्यक्तीला दहा सेकंदामध्ये या प्रकारच्या 3 मिरच्या खायच्या होत्या. पण त्याने त्याआधीच या मिरच्या खात हा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. या व्हिडिओमध्ये माईक या मिरच्या खाण्याआधी स्वतःला कशा पद्धतीने तयार करत आहे हे दिसून येत आहे. यामध्ये तो स्वतःला गालावर चापट मारत आणि डोकं हलवत तयार करताना दिसून येत आहे. 21 नोव्हेंबर 2020 ला हा वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यात आल्याची माहिती या रेकॉर्डच्या कमिटीने दिली आहे.

कोरोनाच्या(Covid19) संकटामुळे हा व्हिडीओ त्याच्याच घरी शूट करण्यात आला. त्याची पत्नी जॅमी जॅक यामध्ये प्रत्यक्ष साक्षीदार आणि पंचाची भूमिका पार पाडत होती. हा रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी त्याला 10 सेकंदाच्या आत या तीन मिरच्या पूर्णपणे खाऊन टाकायच्या होत्या. याचबरोबर या मिरच्या पूर्णपणे खाल्ल्या आहेत कि नाही हे दाखवण्यासाठी जीभ देखील बाहेर काढून दाखवायची होती. पण हा रेकॉर्ड पूर्ण केल्यानंतर त्याची अवस्था फारच वाईट झाली. यामध्ये त्याला श्वास घेण्यास अडचण आणि खोकला येण्यास सुरुवात झाली. यामुळे तो व्हिडीओमध्ये असं म्हणताना दिसत आहे की, 'मला चांगलं वाटत नाही आहे... मी खूप hurt झालो आहे'.

(हे वाचा-कोरोना लशीनं केली कमाल! पहिल्या डोसनंतरच 67 टक्क्यांनी घटला संसर्ग)

माईक जॅक (Mike Jack) हा स्वतःच युट्युब चॅनल चालवत असून यामध्ये तो जगभरातील विविध तिखट मिरच्यांचे रिव्यू करत असतो. Mike Jack Eats Heat या नावानं त्याचं हे युट्युब चॅनल असून यामध्ये तो Mike Jacks’ Hot Reviews नावानं जगभरातील मिरच्यांची चव चाखून त्याचं रिव्यू करत असतो. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने 2017 मध्ये आपल्या वेबसाईटवर Carolina Reaper Chilli pepper ही जगभरातील सर्वात तिखट मिरची असल्याची नोंद केली आहे. या मिर्चीमधून 1.5 million Scoville Heat Units निर्माण होतात. हे युनिट मिर्चीमधील तिखटाचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते. साधारणपणे पिझ्झा आणि सॅन्डविचमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिरचीमध्ये हे प्रमाण 2,500 to 8,000 SHU इतकं असतं.

(हे वाचा - भारतासह 20 देशांतल्या नागरिकांना सौदी अरेबियात प्रवेशबंदी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय)

जॅक याने याआधी देखील अनेक वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहेत. हा त्याचा चौथा वर्ल्ड रेकॉर्ड असून यामध्ये त्याने सर्वात जलद मिरच्या खाण्याचा रेकॉर्ड केला आहे. जानेवारी 2019 मध्ये त्याने पहिला रेकॉर्ड बनवताना Bhut Jolokia  नावाची मिरची 9.75 सेकंदामध्ये खाल्ली होती. Bhut Jolokia  ही मिरची भारतीय सैनिक देखील वापरात असून याला घोस्ट मिरची (Ghost Pepper) म्हणून देखील ओळखले जाते. यानंतर त्याने 1 मिनिटामध्ये 97 ग्रॅम  most Bhut Jolokia मिरची खात हा रेकॉर्ड मोडला होता. याचबरोबर फेब्रुवारी 2020 मध्ये त्याने 2 मिनिटामध्ये 246 ग्रॅम 'most Bhut Jolokia' नावाची मिरची खाण्याचा रेकॉर्ड केला होता. यानंतर मागील वर्षी या तीन मिरच्या खाण्याचा रेकॉर्ड केला आहे.

First published:

Tags: Covid19, Social media, World record