'मी मजदूर आणि मजबूर', घरी जाण्यासाठी चोरली सायकल अन् मालकाला ठेवली चिठ्ठी

'मी मजदूर आणि मजबूर', घरी जाण्यासाठी चोरली सायकल अन् मालकाला ठेवली चिठ्ठी

नमस्कार मी तुमची सायकल घेऊन जातोय... मजुराने चोरीनंतर सायकल मालकासाठी लिहिलेली चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल झाली.

  • Share this:

जयपूर, 17 मे : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन  वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये प्रवासी मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. सर्व काम बंद असल्यानं पैसे नाहीत आणि त्यामुळे खाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावी जाण्यासाठी मजुर जीव धोक्यात घालत आहेत. आता सोशल मीडियावर एक चिठ्ठी व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका मजुराने लिहिलं आहे की गावी जाण्यासाठी सायकल चोरी करावी लागली. चोरीनंतर मजुराने लिहिलेल्या या माफीनाम्यात चोरीचं कारणही सांगितलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही चिठ्ठी राजस्थानमधील भरतपूर इथली असल्याचं म्हटलं जात आहे. उत्तर प्रदेशातल्या बरेलीत राहणाऱ्या मजुराला त्याच्या मुलासह घरी जायचं होतं. पण जाण्यासाठी काही व्यवस्था नव्हती तेव्हा त्याने सायकलची चोरी केली आणि मालकासाठी पत्र लिहून ठेवलं.

चिठ्ठीत काय लिहिलंय

'नमस्कार.. मी तुमची सायकल घेऊन जातोय. शक्य झालं तर मला माफ करा. कारण माझ्याकडं कोणतंच वाहन नाही. माझा एक मुलगा आहे त्याच्यासाठी मला हे करावं लागलं. तो दिव्यांग आहे आणि चालू शकत नाही. आम्हाला बरेलीला जायचं आहे. तुमचाच मजबूर मजदूर'

चिठ्ठीत त्या व्यक्तीने मोहम्मद इकबाल असं स्वत:चं नाव लिहिलं आहे. सोमवारी उशिरा रात्री भरतपूर जिल्ह्यातील रारह गावातल्या साहब सिंग यांच्या घरात त्यानं सायकल चोरी केली. सिंग यांना दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्या अंगणार ही चिठ्ठी सापडली.

हे वाचा : निलंबित डॉक्टरचे सरकार विरोधात आंदोलन, पोलिसांनी हात बांधून रिक्षात घालून नेलं

First published: May 17, 2020, 8:51 PM IST

ताज्या बातम्या