मुंबई, 8 फेब्रुवारी : सध्या आपल्या आजूबाजूला आवाज इतका असतो की, प्रत्येक व्यक्ती शांततेच्या शोधात असतो. कधी कधी हा आवाज इतका वाटतो की लोकांचं डोकं उठतं. तुम्ही ऑफिसला जा किंवा मग रस्त्यात असाल. आवाज काही थांबतच नाही. पृथ्वीवर देखील बहुतेक ठिकाणी आवाज असणे सामान्य आहे.
दिवसेंदिवस वाढणारी वाहने आणि लाऊड स्पीकर्सची संख्या, सार्वजनिक काम, तसेच कंस्ट्रक्शन यामुळे ध्वनी प्रदूषणात आणखीनच वाढ झाली आहे. त्यामुळे बऱ्याचदा माणसं शांततेच्या शोधात समुद्र किनारी किंवा मग गावाकडे जातात. ज्यामुळे त्यांना थोड्या प्रमाणात शांती आणि निवांतपणा जाणवतो.
हे ही पाहा : जुगाडात भारतीयांचा हात कोणीच पकडू शकत नाही, हे सिद्ध करणारे काही Viral Photo
आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की देवा मला शांती दे, किंवा जगात अशी कोणती जागा आहे जी मला शांती मिळवून देईल. तर हो अशी एक जागा आहे. जी तुम्हाला शांती मिळवून देईल. ती शांती अनेकांना नकोशी झाली आहे. आता तुम्ही म्हणाल की आजच्या जगात शांती कोणाला नको असेल. आधी तुम्ही या ठिकाणाबद्दल नीट जाणून घ्या.
ही एक अशी खोली आहे जिथे तुम्ही प्रवेश करताच, तुम्हाला तुमचा श्वास, हृदयाचे ठोके आणि रक्त प्रवाह ऐकू येईल.
आम्ही ज्या खोलीबद्दल बोलत आहोत ती खोली मायक्रोसॉफ्टने तयार केली होती. जी रेडमंड, वॉशिंग्टनमध्ये बांधली गेली आहे. या खोलीचे नाव Anechoic Chamber असे आहे, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रतिध्वनी निर्माण होत नाही.
या खोलीतून केवळ आवाजच नाही तर विद्युत चुंबकीय लहरीही येत नाहीत. त्यामुळे या खोलत गरजेपेक्षा जास्त शांतता आहे. ज्यामुळे येथे हाडांचा कडकडाटही ऐकू येतो. यासोबतच धमन्यांमध्ये होणारा रक्तप्रवाह जाणवू शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आतापर्यंत येथे कोणीही 1 तासापेक्षा जास्त वेळ थांबलेला नाही.
आता तुमच्या मनात असा प्रश्न नक्कीच आला असेल की ही खोली कशी तयार केली गेली?
या खोलीचे वैशिष्ट्य म्हणजे 6 लेयर काँक्रीट आणि स्टीलने डिझाइन केले आहे, याशिवाय यामध्ये स्प्रिंगचीही मदत घेण्यात आली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही खोली बाहेरील वातावरणापासून पूर्णपणे अलिप्त आहे आणि बाहेरून कोणताही आवाज ऐकू येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Social media, Top trending, Viral