मराठी बातम्या /बातम्या /Viral /

LIVE VIDEO: काळ आला पण वेळ नाही; वादळात उडालं लोखंडी छत, ऐनवेळी कार पुढे गेली अन्...

LIVE VIDEO: काळ आला पण वेळ नाही; वादळात उडालं लोखंडी छत, ऐनवेळी कार पुढे गेली अन्...

Viral Video: सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वादळात चक्क लोखंडी छत उडाताना दिसत आहे. या दुर्घटनेत एक कार थोडक्यात बचावली आहे.

  • Published by:  News18 Desk
न्यू साउथ वेल्स, 26 डिसेंबर: वादळात घराबाहेर पडणं किती धोकादायक असतं हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्याची खरी जाणीव तेव्हाच होते, जेव्हा एखादी मोठी दुर्घटना माणूस स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वादळात चक्क लोखंडी छत उडाताना दिसत आहे. सुसाट वाऱ्यांच्या साथीने सुरू असलेल्या या वादळात हे लोखंडी छत रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारजवळ जाऊन पडलं (Metal Roofing Fall near moving car video) आहे. ऐनवेळी कार पुढे गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या थरारक घटनेचा लाइव्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भयावह व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील वादळाचा (Australia Storm Viral Video) आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वादळ सुरू असताना काही कार रस्त्यावरून जाताना दिसत आहेत. यावेळी एक लोखंडी छत आकाशातून उडत कारजवळ येऊन पडलं आहे. हा व्हिडीओ 'व्हायरल आणि शॉकिंग' व्हिडीओजसाठी प्रसिद्ध सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हेही वाचा-स्मोकिंगचा भयंकर Video; पाहिल्यानंतर सिगारेट ओढणं सोडा साधं नावही काढणार नाहीत ही घटना 19 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये घडली. व्हिडीओमध्ये जोरदार वादळ सुरू असलेलं दिसत आहेत. या वादळात काही वाहने रस्त्यावर धावत आहेत. वाऱ्यांचा वेग एवढा जास्त आहे की, जणू सर्व काही उडून जाईल, अशी भीती वाटत आहे. हा व्हिडीओ बनवणारा व्यक्ती एका उंच इमारतीच्या बाल्कनीत उभं राहून वादळाचा व्हिडीओ बनवत आहे. यावेळी अचानक एक लोखंडी छत आकाशातून रस्त्याच्या दिशेने उडत येताना दिसलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रस्त्यावर अनेक वाहने धावत असताना देखील हे लोखंडी दोन कारच्या बरोबर मध्ये येऊन कोसळलं आहे. हे लोखंडी छत थोडं पुढे किंवा थोडं पाठीमागे कोसळलं असतं, तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहे. अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत.
First published:

Tags: Australia, Shocking viral video

पुढील बातम्या