Home /News /viral /

'26 एप्रिलला माझं लग्न आहे, मला पळवून घेऊन जा'; 10 रुपयांच्या नोटेवर BF साठी GF चा मेसेज VIRAL

'26 एप्रिलला माझं लग्न आहे, मला पळवून घेऊन जा'; 10 रुपयांच्या नोटेवर BF साठी GF चा मेसेज VIRAL

गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडसाठी 10 रुपयांच्या नोटेवर दिला मेसेज. सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही नोट.

    मुंबई, 20 एप्रिल : 'सोनम गुप्ता बेवफा है'वाली पैशांची नोट तुमच्या लक्षात असेलच. आता अशीच एक नोट पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होते आहे (Love Letter on Currency note). पण यावेळी प्रकरण थोडं वेगळं आहे. एका गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडसाठी 10 रुपयांच्या नोटवर मेसेज दिला आहे. ही नोट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Kusum Love Letter for vishal). कुसुम नावाच्या तरुणीने विशाल नावाच्या आपल्या बॉयफ्रेंडसाठी दहा रुपयांच्या नोटेवर संदेश दिला आहे (Vishal Meri Shadi Hai 26 April Ko). आपलं लग्न ठरलं असून आपल्याला पळवून घेऊन जा, असा मेसेज कुसुमने विशालला दिला आहे. 10 रुपयांच्या नोटेवर लिहिलं आहे, "बिशाल, माझं लग्न 26 एप्रिलला आहे. मला पळवून घेऊन जा. मी तुझ्यावर प्रेम करते. तुझी कुसुम" @vipul2777 या ट्विटर अकाऊंटवर या नोटेचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे, "ट्विटर आपली ताकद दाखवा. 26 एप्रिलपूर्वी कुसुमचा हा मेसेज विशालपर्यंत पोहोचवायचा आहे. दोन प्रेम करणाऱ्यांना भेटवायचं आहे. कृपया तुम्ही तुमच्या ओळखीतील सर्व विशाल नावाच्या तरुणांना टॅग करा" हे वाचा - कित्येक जण शोधून शोधून थकले; पाहा तुम्हाला तरी सापडतो आहे का या आंब्यांमध्ये लपलेला पोपट आता दोन प्रेम करणाऱ्यांना एकत्र करणाऱ्यांची कमी नाही. किती तरी लोक असे आहेत, जे अशा कपलला भेटवण्यासाठी जमीन-आकाशही एक करतात. ही नोट किंवा ही पोस्ट पाहिल्यानंतरही असंच काहीसं घडतं आहे. या पोस्टवर बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांनी याला गांभीर्याने घेतलं आणि आपण विशाल-कुसुम यांना भेटवणारच असा निश्चय केला आहे. कुसुमचा हा मेसेज त्या विशालपर्यंत पोहोचवण्यासाठी काहींनी धडपड सुरू केली आहे. काही जण त्या विशालला शोधू लागले आहेत. तर काही लोकांनी हे मजेत घेत त्यावर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हे वाचा - 'तुझ्याकडून हजामत नको रे बाबा', Saloon मध्ये Barber चं विचित्र कृत्य पाहून घाबरले ग्राहक; VIDEO VIRAL आता तुम्ही यात काय भूमिका घेणार हे तुम्हीच ठरवा. पण आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन कळवायला विसरू नका.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral news

    पुढील बातम्या