मराठी बातम्या /बातम्या /Viral /

स्टंट करताना Mercedes ला लागली आग; 70 लाखांची गाडी जळून खाक, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

स्टंट करताना Mercedes ला लागली आग; 70 लाखांची गाडी जळून खाक, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

बर्नाऊट सेशन करताना मर्सिडीज (Mercedes Benz) आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ गाडीतील लोकांना याची माहिती दिल्याने त्यांना सुखरूप बाहेर पडता आलं.

सिडनी, 25 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) विविध प्रकारच्या स्टंटचे फोटो व्हायरल होत असतात. यात व्यक्तींबरोबरच गाड्यांच्या (Stunt) स्टंटचे देखील व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात बर्नाऊट सेशन करताना मर्सिडीज (Mercedes Benz) आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहे. 1 लाख डॉलर म्हणजे जवळपास 70 लाख किमतीची ही गाडी काही मिनिटांतच मालकाच्या डोळ्यासमोर जळून खाक झाली. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सिडनीमधील चेस्टर हिल येथे ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये 25 वर्षीय व्यक्ती आपल्या AMG C63S या मर्सिडीज (Mercedes Benz) गाडीबरोबर स्टंट करत होता. यावेळी बर्नाऊट करत असताना गाडीच्या टायरने आग पकडली. काही क्षणांतच संपूर्ण गाडीने पेट घेतला. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ गाडीतील लोकांना याची माहिती दिल्याने त्यांना सुखरूप बाहेर पडता आलं. महत्त्वाचं म्हणजे ही घटना घडत असताना सोशल मीडियावर हा स्टंट लाईव्ह (Live) दाखवण्यात येत होता. यामुळे जगभर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

(वाचा - सोशल मीडियावर सुरू होता वधुचा शोध; काश्मीरमधून आलं स्थळ; PHOTO तर पाहा)

ही आग लागल्यानंतर घटनास्थळी न्यू साऊथ वेल्सच्या (NSW) अग्निशमन दलाने दाखल होत आग विझवली. या घटनेत गाडीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून रस्त्याचं देखील मोठं नुकसान झालं आहे. बँकटाऊन पोलिस एरिया कमांडमधील पोलिसांनी या घटनेविषयी माहिती देताना, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याचा तपास केला. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या गाडी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. धोकादायक आणि निष्काळजीपणे वाहन चालविण्याचा आरोप ठेवत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(वाचा - देशातील पहिला Garbage Cafe; प्लास्टिक आणा आणि मोफत करा ब्रेकफास्ट, लंच..डिनर)

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक जणांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजण यात ड्रायव्हरला जबाबदार ठरवत आहेत. तर काहीजण या घटनेच्या व्हिडीओची मजा घेत मजेशीर कमेंट करत आहेत. या व्यक्तीने मागील वर्षी ही गाडी लॉटरीमध्ये (Raffle) जिंकली होती. ही घटना घडली त्यावेळी त्याने ही गाडी विक्रीसाठी ठेवली असल्याचं काही रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. या घटनेप्रकरणी मालकाला 11 मार्चला स्थानिक न्यायालयामध्ये हजर राहावं लागणार आहे.
First published:

पुढील बातम्या