मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Mercedes-Benz च्या CEO नेसुद्धा सोडली आलिशान गाडी; पुण्यात रिक्षातून केला प्रवास कारण...

Mercedes-Benz च्या CEO नेसुद्धा सोडली आलिशान गाडी; पुण्यात रिक्षातून केला प्रवास कारण...

मर्सिडीजच्या सीईओचा रिक्षातून प्रवास.

मर्सिडीजच्या सीईओचा रिक्षातून प्रवास.

मर्सिडीज-बेंज इंडियाचे एमडी आणि सीईओ मार्टिन श्वेंक आलिशान गाडी सोडून पुण्याच्या रस्त्यावर चक्क ऑटो रिक्षातून प्रवास करताना दिसले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Priya Lad

पुणे, 30 सप्टेंबर :  मर्सिडीज सर्वात सुरक्षित आणि आलिशान गाड्यांपैकी एक. आपल्याकडेही मर्सिडीज असावी असं स्वप्न अनेकांचं असतं. पण सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर मर्सिडीज वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आली. या गाडीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होऊ लागले. आता तर मर्सिडीजच्या सीईओनेसुद्धा आपली ही आलिशान गाडी सोडली आहे. मर्सिडीज-बेन्झ इंडियाचे एमडी आणि सीईओ मार्टिन श्वेंक पुण्याच्या रस्त्यावर आपल्या या आलिशान गाडीऐवजी चक्क ऑटो रिक्षातून प्रवास करताना दिसले.

मार्टिन श्वेंक यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःच याची माहिती दिली आहे. त्यांनी ऑटोतून प्रवास करताना आपला फोटोही पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी आपण आपली महागडी गाडी सोडून ऑटोतून का प्रवास करत आहोत? अशी वेळ त्यांच्यावर का ओढावली? याचं कारणही सांगितलं आहे.

हे वाचा - ...जेव्हा Pm Narendra Modi यांच्या गाडीसमोर आली Ambulance; काय घडलं पाहा VIDEO

मार्टिन यांनी मर्सिडीज सोडून ऑटोतून प्रवास केला याचं कारण म्हणजे ट्रॅफिक. मार्टिन यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे, "जर तुमची एस-क्लास पुण्याच्या रस्त्यावरील ट्रॅफिकमध्ये अडकली तर तुम्ही काय करता? कदाचित कारमधून उतरून काही किलोमीटर पायी चालणं सुरू करता आणि मग रिक्षा पकडता"

मार्टिन यांची ही पोस्ट तुफान व्हायरल होते आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटिझन्सनी त्यांना ऑटोतून प्रवास करण्याचा अनुभवही विचारला आहे. तर काहींनी त्यांचं कौतुक केलं आहे.

श्वेंक 2006 पासून मर्सिडीज-बेन्झशी जोडले गेले आहेत. 2018 पासून मर्सिडीज-बेन्झ इंडियाचे सीईओ आहे. याआधी ते मर्सिडीज-बेंज चीनचे मुख्य वित्तीय अधिकारी होते.

हे वाचा - कंडक्टरशी हुज्जत, बसमध्ये आजीबाईने घातला गोंधळ; तरी VIDEO पाहून वाटेल कौतुक

मर्सिडीज-बेन्झ कार ही सर्वात महागडी कार आहे. भारतात या कारच्या सर्वात स्वस्त मॉडेलचीच किंमत 49.92 लाख रुपयांपासून सुरू होते. मार्टिन श्वेंक यांनी ज्या Mercedes Benz S Class चा उल्लेख केला ती एक क्लासिक बिजनेसमॅन कार आहे. याचं इंटिरिअर खूप सुंदर आहे आणि यामध्ये अॅडव्हान्स फिचर्स आहेत. S क्लासमध्ये हाइब्रिड पावरट्रेन ट्रिमसोबत 4.0-लीटर ट्विन-टर्बो V8 आणि 3.0-लीटर ट्विन-टर्बो सिक्स-पॉट है. या लक्झरी कारची किंमत 1.36 कोटी रुपयांपासून सुरू होते.

First published:

Tags: Car, Pune, Traffic, Viral, Viral videos