बीजिंग, 21 जानेवारी : हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकीत झाला असाल. महिलांच्या अंडरगार्मेंट्समध्ये पुरुष का दिसत आहेत? की आपल्या पाहण्यात काही चूक झाली आहे. तर नाही... या फोटोत महिलांच्या अंडरगार्मेंट्समध्ये असलेले हे पुरुषच आहेत. पण त्यांनी महिलांचे अंडरगार्मेंट्स का घातले आहेत? असा प्रश्न सोशल मीडियावर अनेकांना पडला आहे. कारण हे असे फोटो व्हायरल होत आहेत.
हा प्रकार दुसरा तिसरा कुठला नाही तर चीनमधील आहे. चीनमधील पुरुष मॉडेल्स महिलांचे अंडरगार्मेंट्स घालून सोशल मीडियावर मॉडेलिंग करत आहेत. असं नेमकं काय घडलं आहे, यामागे नेमकं काय कारण आहे? तर चिनी सरकारने सोशल मीडियावर अशा प्रचारावर लावलेली बंदी. ज्यावर तोडगा म्हणून कंपन्यांनी हा असा विचित्र मार्ग काढला आहे.
हे वाचा - पुरुषांनो, तुम्हाला माहिती आहे का महिलांना सर्वात जास्त कोणता कंडोम आवडतो?
एखाद्या कंपनीने प्रोडक्ट लाँच केलं की लोकांना त्याची माहिती होण्यासाठी जाहिरात केली जाते. वेगवेगळ्या माध्यमातून त्या प्रोडक्टबाबत लोकांना सांगितलं जातं. सध्याच्या घडीला सोशल मीडिया हा अशा जाहिरातीचा सर्वात मोठा मार्ग आहे. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार चीनमध्ये लाइव्ह स्ट्रिम कॉमर्स इंडस्ट्री खूप मोठी आहे. इथं प्रत्येक वस्तूंची मार्केटिंग लाइव्ह स्ट्रिम बिझनेसमार्फत होते. म्हणजे लोक सोशल मीडियावर लाइव्ह येत संबंधित प्रोडक्ट्सबाबत सांगतात. पण सरकारने या लाइव्ह स्ट्रिम प्लॅटमफॉर्मवर बंदी आणली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.