Home /News /viral /

तरुणांना आला 'करावं तसं भरावं'चा प्रत्यय, आगीशी घेतला पंगा; अंगावर शहारे आणणारा VIDEO

तरुणांना आला 'करावं तसं भरावं'चा प्रत्यय, आगीशी घेतला पंगा; अंगावर शहारे आणणारा VIDEO

Social media viral video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये काही तरुण आगीतून उड्या मारताना दिसत आहेत.

  नवी दिल्ली, 12 मे: दररोज सोशल मीडियावर हजारो व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतं असतात. ज्यामध्ये लोकं विविध प्रकारचे साहसी खेळ (Stunt) करतात. पण बऱ्याच वेळा असा साहसी खेळ त्यांच्या अंगलट येण्याचीही शक्यता अधिक असते. यापूर्वी असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, ज्यामध्ये साहसी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये काही तरुण आगीतून उड्या मारताना दिसत आहेत. पण यावेळी हे तरुण मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. असं म्हटलं जातं की, पाण्याशी आणि आगीशी कधीही पंगा घेऊ नये. कारण हा पंगा कधीही जीवघेणा ठरू शकतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. काही तरुण बिंधास्तपणे आगीत इकडून तिकडे उड्या मारत आहेत. यातील एक तरुण आगीतून उडी मारून दुसऱ्या बाजूला आला. तेव्हा दुसऱ्या बाजूनं आणखी एक तरुण धावत आला. यावेळी दोन्ही बाजूंनी दोन तरुण धावत आल्यानं त्यांची बरोबर आगीच्या ठिकाणी धडक बसली आणि दोघंही आगीत पडले. हे वाचा-जोराच्या वाऱ्यात तुटला चीनचा Glass bridge; 330 फुटांवर लटकत राहिला पर्यटक आणि... आगीत पडल्यानंतर दुसऱ्याच क्षणात हे तरुण आगीतून बाहेर आल्यामुळं त्यांचा प्राण वाचला आहे. पण त्यांच्या फाजील आत्मविश्वासामुळं ते जर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते, तर होत्याचं नव्हतं व्हायला फारसा वेळ लागला नसता. त्यांच्या या तरकट खेळाबाबत सोशल मीडियात अनेकजण संताप्त व्यक्त करत आहेत.
  हे वाचा- यांना कोणीतरी आवरा रे! मक्याच्या शेतातून बँड-बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव, VIDEO पाहून नाही आवरणार हसू संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असून अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. तर आतापर्यंत 12 हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Shocking news, Social media viral, Stunt video

  पुढील बातम्या