• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • महिलेला घेरून काठीने मारहाण, पीडितेनं दिला ‘करारा जवाब’; पाहा VIDEO

महिलेला घेरून काठीने मारहाण, पीडितेनं दिला ‘करारा जवाब’; पाहा VIDEO

महिलेला काही पुरुष काठीनं (Men beats woman with sticks and she retaliates) अमानूष मारहाण करत असून ती महिलादेखील त्याला सडेतोड प्रतिसाद देत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

 • Share this:
  जोधपूर, 15 नोव्हेंबर: महिलेला काही पुरुष काठीनं (Men beats woman with sticks and she retaliates) अमानूष मारहाण करत असून ती महिलादेखील त्याला सडेतोड प्रतिसाद देत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. एकाकी महिलेला घेरून (Viral video of attack on woman) तिच्यावर लाठाकाठ्या आणि लाथाबुक्क्यांनी प्रहार करणारे पुरुष आणि त्याला प्राणपणानं विरोध करणारी महिला यांचा संघर्ष या व्हिडिओत दिसत आहे. काय आहे प्रकरण? राजस्थानच्या जोधपूर परिसरातील हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे. जमिनीच्या वादातून या महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न काही ग्रामस्थ करत होते. मात्र या हल्ल्याला न घाबरता महिला त्याचा प्रतिकार करत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. सुरुवातीला या महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावर महिलेनं रौद्र रूप धारण केल्यावर ट्रॅक्टर तिच्यापासून लांब गेल्याचं दिसतं. मात्र त्यानंतर पुन्हा हा ट्रॅक्टर तिच्याकडे आला आणि तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. महिला आणि तिच्या कुटुंबीयांवर हल्ला करण्याचा प्रयत्न काही ग्रामस्थ करत होते. डोक्यावर आणि पायांवर लाठीहल्ला काही पुरुष आक्रमक होत लाठ्या घेऊन येतात आणि महिलेच्या पायावर आणि डोक्यात काठी मारतात. मात्र तरीदेखील विचलित न होता महिला आपला प्रतिकार सुरू ठेवते आणि हल्ल्याला विरोध करते. महिला घाबरत नसल्याचं पाहून हल्लेखोर घाबरतात आणि माघार घेऊ लागतात. महिला हे सगळे वार सहन करते. ही महिला प्रतिवार करत नाही. मात्र तिची सहनशक्ती आणि नजर पाहून काही वेळाने हल्लेखोरांच्या मनात भीती निर्माण होते आणि ते तिथून काढता पाय घेतात. पोलिसांत तक्रार नाही या प्रकरणाची कुठलीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी याबाबत कुठलीच माहिती द्यायला नकार दिला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. महिलेचं समर्थन करणाऱ्या आणि हल्लेखोरांना कडक शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओखाली आल्या आहेत.
  Published by:desk news
  First published: