आतापर्यंतची कहर बातमी! माकडांनी पळवली COVID रुग्णांची सँपल्स पाहा VIDEO

आतापर्यंतची कहर बातमी! माकडांनी पळवली COVID रुग्णांची सँपल्स पाहा VIDEO

या माकडांच्या हातात अजूनही कोव्हिड संशयित रुग्णांची सँपल्स असल्यामुळे आता ती माकडं जिथे जिथे नाचतील, तिथे विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

  • Share this:

मेरठ (उत्तर प्रदेश), 29 मे : Coronavirus च्या रुग्णांबाबत गैरसोय, कोरोनाची साथ, चाचण्या, त्यांची आकडेवारी, अडचणी, भीती याच्या इतक्या बातम्या तुम्ही आतापर्यंत वाचल्या असतील, पण आज जे घडलं तसलं काही कधीच ऐकलं नसेल. मीरत मेडिकल कॉलेजच्या (Meerut Medical college ) कोरोना टेस्ट लॅबमधला हा प्रसंग कहर म्हणता येईल.

माकडांची (Monkeys) एक टोळी मेडिकल कॉलेजच्या या परिसरात नेहमीच दिसते.  इतके दिवस त्याकडे फारसं कुणी लक्ष दिलं नव्हतं. पण त्यातल्या माकडांनी आज सकाळी कहर केला. COVID-19 च्या रुग्णांच्या स्वॅबचे नमुने (covid-19 samples) चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यातली तीन सँपल्सच माकडांनी पळवली.

उत्तर प्रदेशात मेरठमध्ये हा प्रकार घडला. इंडिया टुडेने यासंदर्भात बातमी दिली आहे. या माकडांच्या हातात अजूनही कोव्हिड संशयित रुग्णांची सँपल्स असल्यामुळे आता ती माकडं जिथे जिथे नाचतील, तिथे विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात भयंकर हाहाकार उडाला आहे. या घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या भागात माकडांचा सुळसुळाट आहे आणि त्यांनी यापूर्वीही इथे हैदोस घातला असल्याचं मेरठ मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. या प्रकरणी कुणाच्या दुर्लक्षामुळे किंवा निष्काळजीपणामुळे माकडांच्या हाती ही सँपल्स लागली का याचा तपास हॉस्पिटलचे डीन आणि अधीक्षक करत आहेत.

अन्य बातम्या

कोरोनाबाबत राज्यात सत्ताधाऱ्यांची 'अशी ही बनवाबनवी', भाजप नेत्यानं डागली तोफ

मगरींमध्ये 2 तास सुरू होती लढाई, 8 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला VIDEO

तिसऱ्या मजल्यावरून लटकत होता 3 वर्षांचा चिमुरडा, तेवढ्यात आला डिलिव्हरी बॉय

First published: May 29, 2020, 4:26 PM IST

ताज्या बातम्या