Home /News /viral /

VIDEO - एकट्या कोब्रावर तुटून पडली मुंगूसांची गँग; विश्वास बसणार नाही असा लढाईचा The End

VIDEO - एकट्या कोब्रावर तुटून पडली मुंगूसांची गँग; विश्वास बसणार नाही असा लढाईचा The End

एकट्या कोब्राला मुंगूसांच्या कळपाने घेरलं. त्यानंतर जे घडलं ते पाहून अंगावर काटाच येईल.

    मुंबई, 29 एप्रिल : साप आणि मुंगूसाचं शत्रुत्व तुमच्यासाठी काही नवं नाही. सापाला पाहताच मुंगूस त्याच्यावर तुटून पडतो. मग तो साप किती खतरनाक आहे, याचा फरकही त्याला पडत नाही. अशाच एका विषारी कोब्रावर हल्ला करणाऱ्या मुंगूसांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एकट्या कोब्राला मुंगूसांच्या कळपाने घेरलं. त्यानंतर जे घडलं ते पाहून अंगावर काटाच येईल (Meerakt mongoose fight Cobra snake Video). जंगलात एका कोब्राला एकटा पाहून मिरकॅटनी त्याच्यावर हल्ला केला. मिरकॅट हे दक्षिण आफ्रिकेत आढळतात. ही मुंगूसाची एक प्रजाती मानली जाते. त्यांना आफ्रिकन मुंगूसही म्हटलं जातं. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला जंगलात काही मिरकॅट दिसतात. त्यानंतर तिथं त्यांना एक कोब्रा दिसतो. हा कोब्रा एकटाच असतो. त्याला पाहताच सर्वच्या सर्व मिरकॅट त्याच्या दिशेने धावत जातात आणि त्याला सर्व बाजूंनी घेरतात. त्याच्यावर तुटून पडतात. हल्ला करतात. हे वाचा - बापरे! तरुणाच्या खांद्यावर चढले 2 महाकाय अजगर आणि...; थरकाप उडवणारा VIDEO पण तो कोब्रा आहे साधासुधा साप नाही. इतक्या मुंगूसांना पाहूनही त्याने हार मानली नाही. त्याने एकट्याने इतक्या मुंगूसांचा प्रतिकार केला. जसे मुंगूस त्याच्यावर हल्ला करायचे, त्याच्यावर धावून यायचे तसा तो आपला फणा काढून त्यांना दंश करायला जायचा. व्हिडीओच्या शेवटी मिरकॅट एका बाजूला आणि कोब्रा एका बाजूला दिसतो. मिरकॅटही कोब्राला घाबरलेले दिसतात. ते एका ठिकाणी एकत्र शांत उभे राहिलेले दिसतात आणि कोब्रा तिथून जाताना दिसतो. हे वाचा - तलावात मासेमारी करणाऱ्या दाम्पत्याच्या बोटीवर अचानक चढली मगर, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO पण या लढाईचा शेवट नेमका काय झाला हे मात्र या व्हिडीओत दाखवण्यात आलं नाही. National Geographic UK च्या यूट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Snake, Snake video, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या