McDonald's चा बर्गर खात होती तरुणी, सापडलं असं काही की दातांचा झाला चुरा; PHOTO VIRAL

McDonald's चा बर्गर खात होती तरुणी, सापडलं असं काही की दातांचा झाला चुरा; PHOTO VIRAL

मॅकडोनाल्डचे फास्ट फूड हे लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. मात्र गेल्या अनेक वर्षात मॅकडोनाल्डच्या (McDonald's) बर्गर किंवा इतर पदार्थांचा दर्जा खालावला आहे.

  • Share this:

सिडनी, 18 फेब्रुवारी : मॅकडोनाल्डचे फास्ट फूड हे लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. मात्र गेल्या अनेक वर्षात मॅकडोनाल्डच्या (McDonald's) बर्गर किंवा इतर पदार्थांचा दर्जा खालावला आहे. असाच काहीसा प्रकार नुकताच ऑस्ट्रेलियात घडला. ऑस्ट्रेलियामधील एका महिलेला मॅकडोनाल्डच्या चिकन बर्गरमध्ये एक लहान धातूची सापडली. या महिलेने फेसबुकवर फोटो पोस्ट केल्यानंतर मॅकडोनाल्डच्या बर्गरबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे.

एडा तुपा यांनी आपल्या फेसबुकवर एक मोठे कॅप्शन लिहित मॅकडोनाल्डला खडेबोल सुनावले. तुपा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये बर्गरच्या आत धातूची रॉड अडकल्याचे दिसत आहे. तुपा यांना अर्ध्या बर्गर खाल्ल्यानंतर ही धातूचा रॉड दिसली. द सनच्या म्हणण्यानुसार, सिडनीच्या रहिवाश्याने मॅकडोनाल्डच्या दुकानात 'चिकन एन चीझ' बर्गर विकत घेतला. त्यात त्यांना हा छोटा रॉड सापडला.

वाचा-हॉटेलच्या किचनमध्येच कर्मचारी करत होता आंघोळ, VIDEO VIRAL झाला आणि...

वाचा-MPSC ची जाहिरात नाही ही तर लग्नाची निमंत्रण पत्रिका!

बर्गरचा फोटो शेअर करताना तुपा यांनी, "चिकन अँड चीज बर्गरकडून मला काय मिळाले ते पहा. याने जवळजवळ दात तोडले असते”, असे कॅप्शन लिहिले. मुख्य म्हणजे तुपा यांनी आपल्या तीन वर्षांच्या भाचीसाठी हा बर्गर घेतला होता. त्याच्या फेसबुक पोस्टवर बर्‍याच कमेंट्स आल्या आहेत, ज्यात लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

वाचा-VIDEO : 8 वर्षांची चिमुरडी झाली 80 वर्षांची, ‘या’ भयंकर आजारामुळे झाला मृत्यू

टुपा यांनी 7 न्यूजशी बातचीत केल्यानंतर, बर्गर खाताना अचानक त्यांच्या दातात तीक्ष्ण वेदना झाल्या. त्यावेळी त्यांना आता धातुचा तुकडा आढळल्याचे कळले. तुपा या त्वरीत मॅकडोनाल्डच्या दुकानात गेल्या. तेथे त्यांनी मॅनेजरची भेट घेतली. त्यांना दुसरे बर्गर ऑफर केले. ‘न्यूज’ शी बोलताना मॅकडोनाल्डच्या प्रवक्त्यांनी सांगितले की ते या घटनेची चौकशी करतील. ते म्हणाले, “अशी घटना घडल्यामुळे आम्ही दुःखी आहोत. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत”. मात्र या घटनेमुळं मॅकडोनाल्डचे खाद्यपदार्थ लहान मुलांना देण्या लायक आहेत का, हा सवाल पुन्हा उपस्थित झाला आहे.

First published: February 18, 2020, 10:06 AM IST
Tags: burger

ताज्या बातम्या