मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आमंत्रणाशिवायच लग्नात जेवायला गेला; MBA च्या विद्यार्थ्याला मिळालेली शिक्षा पाहून संताप येईल

आमंत्रणाशिवायच लग्नात जेवायला गेला; MBA च्या विद्यार्थ्याला मिळालेली शिक्षा पाहून संताप येईल

भोपाळमध्ये एका लग्न समारंभारत विना आमंत्रणाचं गेलेल्या एका MBA च्या विद्यार्थ्याला चक्क भांडीच धुवावी लागली. ही शिक्षा त्याला फ्रीमध्ये जेवण केल्याने मिळाली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhopal, India
  • Published by:  Kiran Pharate

भोपाळ 01 डिसेंबर : तुम्ही आमिर खानचा थ्री इडियट हा सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला त्यातील एक सीन नक्कीच आठवत असेल. ज्यात आमिर खान आपल्या मित्रांसोबत एका लग्नात निमंत्रणाशिवायच जेवण्यासाठी पोहोचतो. यानंतर ही बाब उघड होताच एकच गोंधळ उडतो आणि शेवटी हे तिघेही तिथून निघून जातात. मात्र, हेच कृत्य भोपाळमधील एका तरुणाला मात्र चांगलंच महागात पडलं आहे.

बायकोला ट्रॅक्टर चालवायला शिकवणं नवऱ्याला पडलं महागात; दुर्घटनेचा Video Viral

भोपाळमध्ये एका लग्न समारंभारत विना आमंत्रणाचं गेलेल्या एका MBA च्या विद्यार्थ्याला चक्क भांडीच धुवावी लागली. ही शिक्षा त्याला फ्रीमध्ये जेवण केल्याने मिळाली. या घटनेचा व्हिडिओही समोर आली आहे. यानंतर हा व्हिडिओ अपलोड करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. हा व्हिडिओ भोपाळच्या एका मॅरेज गार्डनमधील आहे.

व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे अद्याप समजू शकलं नाही. मात्र, तो बुधवारी समोर आला आहे. यानंतर व्हिडिओ बनवणाऱ्यावर आणि तो अपलोड करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. हा युवक जबलपूरमधील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. भोपाळमध्ये तो एका खासगी महाविद्यालयात एमबीएचं शिक्षण घेतो. व्हिडिओ बनवणारा व्यक्ती या तरुणाला प्रश्नही विचारताना दिसतो. यादरम्यान, तो अभ्यास, राहाण्याचं ठिकाण आणि कामाबद्दलही विचारत आहे

इस्त्रीवाला जोमात, नेटकरी कोमात; Desi Jugad Video पाहून बसेल धक्का

व्हिडिओमध्ये दिसतं, की एक तरुण भांडी साफ करत आहे. तर व्हिडिओ बनवणारा व्यक्ती त्याला प्रश्न विचारत आहे. तुला प्लेट धुवून कसं वाटत आहे? असा प्रश्न तो करतो.यावर हा युवक म्हणतो, की मोफत जेवण केलं आहे, मग काहीतरी तर करावंच लागेल. यानंतर व्हिडिओ बनवणारा व्यक्ती त्याला इतरही प्रश्न विचारतो.

व्हिडिओमध्ये समजतं, की चांगलं जेवण करण्यासाठी हा युवक भोपाळच्या गार्डनमध्ये सुरू असलेल्या या लग्नात गेला होता. मात्र, तो पकडला गेला. यानंतर त्याला याची शिक्षा देत त्याचा व्हिडिओ बनवला गेला. व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोडही करण्यात आला.

First published:

Tags: Food, Viral news, Wedding