मुंबई, 21 फेब्रुवारी : शाळेत शिकत असताना गणित आणि इंग्रजीशी 36 चा आकडा असणाऱ्यांना या विषांयाचा अभ्यास फार कंटाळवाणा वाटतो. पण काहींना मात्र हेच विषय आवडतात. व्हॉटसअॅपसह सोशल मीडियावर अनेकदा शब्दकोडी किंवा गणितं एकमेकांना पाठवली जातात. आताही असंच एक गणित व्हायरल होत आहे. 9 वर्षाच्या मुलाने घातलेलं हे गणित सोडवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे.
गणितीय समीकरणं सोडवण्यासाठी सुत्रांची पद्धत अवलंबली जाते. गणितात अंकाऐवजी अक्षरे वापरली असतील तर त्याला चल असं म्हटलं जातं. उदा. a, b, c,...x, y, z. गणितात सर्वसामान्यपणे एक किंवा दोन चल असतात. मात्र, एका 9 वर्षांच्या मुलाने जो प्रश्न विचारला आहे त्यात अनेक चल दिले आहेत. त्यामुळे हे गणित सोडवण्यासाठी जरा जास्त डोकं चालवावं लागत आहे. हे गणित सोडवलं असलं तरी याची उकल आणखी वेगळ्या पद्धतीनेही करता येऊ शकते असं ते शेअर करणाऱ्या युजरने म्हटलं आहे.
At dinner, 9yo made up a math problem and made his father and me solve it. Our attempt to do simultaneous equations got *really* complicated. We figured it out via guess and check, but I still think there has to be a more elegant way... pic.twitter.com/MwHBnG9PBF
— Celeste Ng (@pronounced_ing) February 18, 2020
1) a+e=11
2) a2-f=15
3) f+c=6
4) ac-e=13
उत्तर :
गणित सोडवण्यासाठी आपण दुसऱ्या समीकरणापासून सुरुवात करू. a2-f=15 या समीकरणातील f दुसऱ्या बाजूला घेतल्यास हे समीकरण a2=15+f असं होईल. यातून आपल्याला a2ची किंमत मिळते. म्हणजेच a2 पूर्ण वर्ग असेल आणि 15 पेक्षा मोठा असेल. जर आपण 15 पेक्षा मोठी पूर्ण वर्ग संख्या 16,24,36 यापैकी जवळची 16 ही संख्या गृहीत धरल्यास 15+f = 16 होईल. f ची किंमत 1 येईल.
a2-f=15
a2=15+f
f=1
त्यानंतर a ची किंमत 4 किंवा - 4 असू शकते. आपण 4 ही किंमत मानू.
a2=15+1=16
a= +4,-4
a ची किंमत वापरून आपण पहिले समीकरण सोडवण्याचा प्रयत्न करू. पहिल्या समीकरणात किंमत a टाकल्यानंतर e चे उत्तर 7 येते.
a+c=11
4+e=11
e=11-4
e=7
तिसऱ्या समीकरणात f ची किंमत 1 वापरून c ची किंमत काढली. c चे उत्तर 5 मिळते.
f+c=6
1+c=6
c=6-1
c=5
शेवटी मिळालेली किंमत वापरून ac-e=13 हे समीकरण सोडवले.
ac-e=13
4x5-7=13
20-7=13
13=13
आपल्याला मिळालेल्या तीनही किंमती बरोबर आहेत की चूक हे तपासण्यासाठी त्याची पडताळणी करा. समीकरणांमध्ये मिळालेल्या किंमती वापरून ते सोडवा. दोन्ही बाजूंच्या किंमती समान आल्यास आपले उत्तर बरोबर आले आहे असे समजा नसेल तर पुन्हा डोकं चालवा.
वाचा : परीक्षेला बसल्यानंतर तुम्हाला काहीच आठवलं नाही तर काय कराल?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maths