एका मिनिटासाठी संपूर्ण शहर 'धुळी'स मिळालं, निसर्गाचं रौद्र रुप दाखवणारा हा VIDEO बघाच

एका मिनिटासाठी संपूर्ण शहर 'धुळी'स मिळालं, निसर्गाचं रौद्र रुप दाखवणारा हा VIDEO बघाच

100 मीटर उंच धुळीची भिंत, निसर्गाचं कधीही न पाहिलेलं रुप दाखवणारा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

  • Share this:

नियामे, 07 मे : एकीकडे जगभरात कोरोना थैमान घालत आहे. लॉकडाऊनमुळं निसर्गाचं एक वेगळं रुप पाहायलं मिळत आहे. मात्र पश्चिम आफ्रिकेत निसर्गाचा उद्रेक पाहयाल मिळत आहे. पश्चिम आफ्रिकेच्या नायजर या देशात बुधवारी (06 मे) रोजी धुळीचं वादळ (sandstorm) आले. या वादळाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर निसर्ग एक रौद्र रुप दाखवत असल्याचा भास होतो.

नियामे ही नायजर देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. या शहरात धुळीचं वादळ आलं होते. या वादळाचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला भीती वाटेल. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लाल रंगाच्या धुळीचे कण उडताना दिसत आहे. या वादळाचा परिणाम एवढा होता की, संपूर्ण शहर लाल दिसत होते. जवळजवळ 100 मीटर उंच असे वादळ पाहून थरकाप उडेल. दरम्यान पश्चिम आफ्रिकेतील परिसरात एप्रिल-मे महिन्यात धुळीचे वादळ येत असते.

वाचा-एक सोनार झाला भाजीवाला, 25 वर्ष दागिन्यांनी सजलेल्या दुकानात लागले कांदे, बटाटे

वाचा-VIDEO : महिलेनं उघडली होम मेड वाइनची बाटली, पाहा काय झालं?

काही व्हायरल व्हिडीओमध्ये आकाशातील रंगही बदलले दिसत आहेत. दुपारी 2च्या सुमारासही धुळीमुळं लोकांना समोरचे दिसत नव्हते.

वाचा-'अशी पुढे जाणार अर्थव्यवस्था', आनंद महिंद्रांनी शेअर केला ट्रॅक्टरचा जुगाड VIDEO

ट्विटरवर या वादळाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांची लवकरच जगाचा अंत होणार आहे की काय, असे प्रश्न विचारले. दरम्यान हे वादळ काही मिनिटांसाठी आले होते.

First published: May 7, 2020, 4:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading