नवी दिल्ली, 16 मे : सिंहाला जसं जंगलाचा राजा म्हटलं जातं, तसं पाण्यात राहणारी मगरही (Crocodile) एखाद्या राजापेक्षा कमी नाही. कितीही मोठी शिकार करण्यात मगर तरबेज असते. मगर आपल्या मजबूत जबड्याने शिकार पकडते, त्यावर हल्ला करते. पण अनेकदा मगर अशा प्राण्यावरही हल्ला, जो अतिशय ताकदवान असतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक अफ्रिकन बाराशिंगा (Barasingha) तलावात पाणी पीत असताना, मगर त्यावर हल्ला करते.
एका जंगलात तलावात पाणी पिण्यासाठी अफ्रिकन बाराशिंगा पाण्याच्या आत उतरतो. त्याचवेळी मगर या भल्यामोठ्या बाराशिंगावर हल्ला करते. जशी मगर त्याच्यावर हल्ला करते, तसं बाराशिंगा पाण्याबाहेर येण्यासाठी प्रयत्न करू लागतो. पण मगर त्याचा एक पायचं आपल्या जबड्यात मजबूत पकडून ठेवते.
मगर त्याचा पाय पकडून त्याला पाण्यात खेचण्याचा प्रयत्न करते, जेणेकरुन ती त्याची शिकार करू शकेल. बाराशिंगाही आपला जीव वाचवण्यासाठी संपूर्ण ताकद लावतो. पुढच्या पायांनी तो पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी दुसरीकडे मगरही त्याचा पाय जबड्यात पकडून त्याला आत ओढण्याचा प्रयत्न करते. यादरम्यान बाराशिंगा अनेक पडतो, बाहेर निघण्याचा प्रयत्न करताना तो अनेकदा दमल्याचं दिसतं. तो कितीतरी वेळा काही वेळ तसाच पाण्यात बसून राहतो आणि पुन्हा उठून मगरीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो.
पण काही वेळाच्या या झटापटीनंतर मात्र मगर त्याचा पाय सोडते आणि बाराशिंगा एका झटक्यात पाण्याबाहरे येतो.
मगरीच्या तावडीतून सुटका करुन घेण्यात तो यशस्वी होतोय हा व्हिडीओ एरिक जॉर्ज नावाच्या एका यूट्यूब चॅनेलवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video viral