VIDEO: पाण्यात पाय टाकताच समोर होता 14 फूटी लांब शार्क आणि..., पुढे काय झालं तुम्हीच पाहा!

VIDEO: पाण्यात पाय टाकताच समोर होता 14 फूटी लांब शार्क आणि..., पुढे काय झालं तुम्हीच पाहा!

हा VIDEO पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पाण्यात जाताच समोर होता 14 फूटी शार्क.

  • Share this:

न्यूयॉर्क, 10 सप्टेंबर : मॅसाचुसेट्स किनाऱ्यावर (Massachusetts Beach) एक धक्कादायक प्रकार घडला. एक पांढऱ्या रंगाचा शार्क किनाऱ्याजवळ आल्याचे पाहायला मिळाले. सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या लोकांना हा शार्क अगदी दहा फूट अंतरावर पोहताना दिसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रोव्हन्सटाउनमधील रेस पॉईंट बीचवर एक पांढरा शार्क दिसला. समुद्रावर फिरण्यासाठी आलेल्या एका युवकाने फेसबुकवर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्याने लिहिले आहे की, 'शार्कला पाहिल्यानवंतर लोक सतर्क झाले, कारण बर्‍याच दिवसांपासून किनाऱ्यावर शार्क दिसत होता. मात्र तो किनाऱ्याच्या एवढ्या जवळ येईल असे कोणाला वाटले नव्हते'.

वाचा-तब्बल 1220 दिवसांनंतर व्हीलचेअरवरून उठला तरुण, युझर्स म्हणाले 'Real Inspiration'

वाचा-लॉकडाऊनमध्ये कबाब खाण्याची आली हुक्की! महिलेला द्यावे लागले सव्वा लाख

ही पोस्ट केलेला मॅकेन्झी आपल्या मित्रांसोबत समुद्रकिनारी आला होता. त्यांने डब्ल्यूसीव्हीबीला सांगितले की जेव्हा शार्कचे विंग्ज दिसले तेव्हा काही लोकं पाण्यात होते. त्यांने असा अंदाज व्यक्त केला की हा शार्क सुमारे 12 ते 14 फूट लांब होता.

वाचा-पत्नीला प्रियकरासोबत रंगेहात पकडलं, पतीनं 1 मिनिटात 31 वेळा चपलेनं केली धुलाई

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एका युझरने, 'मी पाण्यात कधीच पाय ठेवणार नाही.' अशी कमेंट केली आहे. अटलांटिक व्हाईट शार्क कन्झर्व्हन्सी या NGO पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यासाठी घटनास्थळावरील फोटोदेखील शेअर केले.

Published by: Priyanka Gawde
First published: September 10, 2020, 11:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading